Tata Group: जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक TCS ही देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड कंपनी बनली आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे टाकत टीसीएसने पहिले स्थान मिळवले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जगातील प्रसिद्ध जागतिक ब्रँड कन्सल्टन्सी फर्म इंटरब्रँडच्या मते, TCS 2023 मध्ये 1.09 लाख कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह 50 सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँडच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 65,320 कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुकेश अंबानी यांचे टेलिकॉम आणि डिजिटल युनिट जिओ देखील 49,027 कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह पहिल्या 5 मध्ये आहे.
इंटरब्रँडने सांगितले की, 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा अहवाल सादर केला. गेल्या दहा वर्षांत या यादीतील कंपन्यांचे संयुक्त ब्रँड व्हॅल्यू 100 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
या काळात कंपन्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 167 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे टॉप 3 मध्ये टॉप 10 ब्रँडच्या एकूण व्हॅल्यूच्या 46 टक्के आहे. याशिवाय टॉप टोटल ब्रँड व्हॅल्यूच्या 40 टक्के टॉप फाइव्हमध्ये आहे.
'या' कंपन्यांचाही टॉप 10 मध्ये समावेश
सध्या आयटी कंपनी इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू 53,323 कोटी रुपये आहे. चौथ्या क्रमांकावर HDFC आणि पाचव्या क्रमांकावर Jio आहे. टॉप 10 मध्ये Airtel, LIC, Mahindra, State Bank of India आणि ICICI यांचा समावेश आहे.
एफएमसीजी हे गेल्या दहा वर्षांतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. यानंतर, गृहनिर्माण आणि पायाभूत क्षेत्रात 17 टक्के आणि तंत्रज्ञान क्षेत्रात 14 टक्के वार्षिक वाढ झाली आहे.
इंटरबँडने सांगितले की पहिल्या 10 कंपन्यांचे ब्रँड व्हॅल्यू 4.9 लाख कोटी रुपये आहे, जे यादीतील उर्वरित 40 ब्रँडच्या एकत्रित व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, ते 3.3 लाख कोटी रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.