‘टेलिकॉम’ फसवणूक sakal
Personal Finance

‘टेलिकॉम’ फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

सायबर सुरक्षा

शिरीष देशपांडे,सीए आणि सायबर गुन्हेविषयक अभ्यासक

अलीकडे अनेक नागरिकांना दूरसंचार नियामक प्राधिकरणामधून (टेलिकॉम रेग्युलेटर ॲथॉरिटी) बोलत आहे. तुमच्या नावावरील आधार कार्ड वापरून, नोंदवलेल्या मोबाइल नंबरवरून अश्लील फोटो पाठवले जात आहेत; तसेच खोट्या जाहिरातींसाठी हा नंबर वापरला जात आहे, असे सांगणारे फोन येत आहेत. असा फोन आल्यानंतर त्यांनी, हा आपला नंबर नाही, असे सांगितले, तर समोरचा सायबर गुन्हेगार विचारतो, की तुमचे आधार कार्ड कधी हरवले होते का? त्याचे उत्तरही ‘नाही’ असे दिल्यानंतरही तुमचा सध्याचा आणि ‘वादातीत’ नंबर दोन्ही थोड्याच वेळात ब्लॉक केले जातील, असे फोन करणारा सायबर गुन्हेगार सांगतो. ते ऐकून फोन आलेली व्यक्ती घाबरून त्याने मागितलेली वैयक्तिक माहिती देते किंवा पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून त्याद्वारे फेक ॲप डाउनलोड करतात आणि काही क्षणातच त्यांच्या बँक खात्यातील पैसे गेल्याचे मेसेज त्यांना मिळतात.

अलीकडेच एका महिलेला, कुरिअर कंपनीतून बोलत आहे, असा फोन आला. तुमच्या नावाचे पार्सल कस्टम्सने पकडले असून, त्यात अमली पदार्थ आणि काही आक्षेपार्ह वस्तू आहेत. तुम्ही पाठवले नसल्यास पोलिस चौकीत ताबडतोब गुन्हा नोंदवा, असे सांगत फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिस चौकीला फोन जोडला. या सर्व प्रकारामुळे समोरची महिला पूर्ण घाबरली आहे, याची खात्री झाल्यावर त्याने यातून बाहेर पडण्यासाठी एका खात्यात २२ लाख रुपये भरायला लावले.

याचप्रमाणे तुमचे ‘केवायसी’ बाकी आहे, वीजबिल, गॅसबिल भरलेले नाही. त्यामुळे आज रात्री ही सेवा बंद होईल, असे खोटे फोन करून पैसे लुबाडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. असा कोणताही फोन आल्यानंतर, न घाबरता, मन स्थिर करण्यासाठी खोल श्वास घेणे, हात-पाय हलवणे असे उपाय करावेत, जेणेकरून भीती कमी होईल व पुढील चुका टाळता येतील.

अशी घ्या काळजी....

अनोळखी नंबरवरून कोणाचाही फोन आला, तर तो चोरट्याचा असेल असे समजा आणि हे लक्षात ठेवूनच सावधपणे बोला. त्याने सांगितलेले कोणतेही बटण दाबू नका.

कोणतीही सरकारी यंत्रणा किंवा कोणतीही बँक सेवा बंद होईल, खाते बंद होईल, असा फोन करत नाही, हे कायम लक्षात ठेवा.

पार्सलसंबंधात काही फोन आल्यास, आपल्या देशात फोन, व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर अशा घटनांचा तपास करण्याची पद्धत नाही आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याविरुद्ध कोणतीही कारवाई करायची असेल, तर त्याबाबत नोटीस, सहीशिक्क्यासह समक्ष येते. अशा प्रकरणात आपण वकील नेमू शकतो. प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्याकडे म्हणणे मांडू शकतो. ताबडतोब ऑनलाइन पैसे भरा, असे सांगितले जात असेल, तर नक्की गडबड आहे, हे समजून जा.

आपल्या नावावर किती मोबाइल कनेक्शन आहेत हे https://sancharsaathi.gov.in/ या वेबसाइटवर तपासा. जी कनेक्शन तुमची नाहीत, त्याबद्दल तक्रार नोंदवा.

असा फोन आल्यास https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT