The Body Shop to Bankruptcy Sakal
Personal Finance

Bankruptcy: सर्वात मोठी कंपनी झाली दिवाळखोर; अमेरिकेत बंद होणार व्यवसाय, कॅनडामध्येही स्टोअर्सला लागले टाळे

The Body Shop to Bankruptcy: कॉस्मेटिक कंपनी 'द बॉडी शॉप'ने अमेरिकेतील सर्व स्टोअर्स बंद केली आहेत. बॉडी शॉपने स्वतःला दिवाळखोर घोषित केले आहे. कंपनीची अवस्था अशी झाली आहे की आता कंपनी कॅनडामधील डझनभर स्टोअर्स बंद करण्याच्या मार्गावर आहे.

राहुल शेळके

The Body Shop to Bankruptcy: कॉस्मेटिक कंपनी 'द बॉडी शॉप'ने अमेरिकेतील सर्व स्टोअर्स बंद केली आहेत. बॉडी शॉपने स्वतःला दिवाळखोर घोषित केले आहे. कंपनीची अवस्था अशी झाली आहे की आता कंपनी कॅनडामधील डझनभर स्टोअर्स बंद करण्याच्या मार्गावर आहे. कंपनीने अधिकृत निवेदनात ही घोषणा केली आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, द बॉडी शॉप कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ते कॅनडामधील त्यांच्या 105 पैकी 33 स्टोअरची विक्री तातडीने सुरू करतील. गेल्या काही वर्षांपासून कंपनी आर्थिक समस्यांचा सामना करत होती, असे अहवालात म्हटले आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे.

कंपनीच्या दिवाळखोरीचे कारण काय?

CNN च्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांतील महागाई वाढीचा द बॉडी शॉप किरकोळ विक्रेत्यांवर परिणाम झाला आहे. यामागे महागाई वाढ हे सर्वात मोठे कारण मानले जाते. कंपनीची स्थापना 1976 मध्ये मानवाधिकार कार्यकर्त्या आणि पर्यावरण प्रचारक अनिता रॉडिक यांनी केली होती.

द बॉडी शॉपचा मुख्य व्यवसाय मॉलमधून चालवला जात होता. अशा परिस्थितीत महागाई वाढल्याने मॉल्समधून होणारी खरेदी कमी झाली आहे. मॉलमधील सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीत घट झाल्याने या कंपनीची आर्थिक स्थिती ढासळली आहे.

बॉडी शॉप कंपनी बी कॉर्प टॅगसह प्रमाणित

बॉडी शॉप कंपनी नैसर्गिक, टिकाऊ आणि अॅनिमल फ्री उत्पादने तयार करण्यासाठी ओळखली जाते. CNN च्या मते, ही जगातील पहिली कंपनी होती ज्याने आपल्या उत्पादनांच्या चाचणीसाठी प्राण्यांचा वापर केला नाही.

यामुळे, कंपनीला 2019 मध्ये बी कॉर्पचा टॅग देण्यात आला. हा टॅग पारदर्शकता आणि पर्यावरण मानकांची पूर्तता करणाऱ्या कंपन्यांना दिला जातो.

2023 पर्यंत, कंपनीचा व्यवसाय 80 पेक्षा जास्त देशांमध्ये 2,500 पेक्षा जास्त किरकोळ ठिकाणी वाढला होता आणि 60 पेक्षा जास्त बाजारपेठांमध्ये ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध होता.

कंपनीची मालकी अनेक वेळा बदलली आहे. 2006 मध्ये आघाडीची सौंदर्य प्रसाधने कंपनी L'Oreal ने 100 कोटी डॉलर्सना कंपनी विकत घेतली होती.

त्यानंतर 2017 मध्ये, ते ब्राझिलियन कंपनी Natura ने 100 दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त किंमतीत विकत घेतली. CNN च्या अहवालानुसार, गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत ऑरेलियसने 266 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT