Pavna Industries Ltd  Sakal
Personal Finance

Pavna Industries Ltd : या कंपनीचा ओला इलेक्ट्रिकसोबत करार, 4 वर्षात 490% परतावा...

पवना आणि ओला इलेक्ट्रिक एकत्र येण्यामुळे केवळ परवडणारी क्षमताच वाढणार नाही तर टू-व्हीलर ईव्हीची क्रेझ असणाऱ्या लोकांसाठी क्वालिटी स्टँडर्ड सुधारतील असे पवना इंडस्ट्रीज लिमिटेडचे एमडी स्वप्नील जैन म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

येत्या काळात तुम्हाला गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही पवना इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Pavna Industries) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. सध्या हा शेअर एनएसईवर 0.03 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 486.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 592.47 कोटी आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 640.85 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 269.60 रुपये आहे.

पवना इंडस्ट्रीजने नुकताच ओला इलेक्ट्रिकसोबत करार केला आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी (EV) इग्निशन स्विच आणि लॅचचा पुरवठा केला जाणार आहे. या करारासह, कंपनीने टू-व्हीकल ईव्ही विभागात प्रवेश केला आहे.

करारांतर्गत, पवना इंडस्ट्रीज संपूर्ण भारतातील ओला इलेक्ट्रिकच्या उत्पादन सुविधांना उच्च दर्जाचे इग्निशन स्विचेस आणि लॅचेस पुरवेल. पवना आणि ओला इलेक्ट्रिक एकत्र येण्यामुळे केवळ परवडणारी क्षमताच वाढणार नाही तर टू-व्हीलर ईव्हीची क्रेझ असणाऱ्या लोकांसाठी क्वालिटी स्टँडर्ड सुधारतील असे पवना इंडस्ट्रीज लिमिटेडचे एमडी स्वप्नील जैन म्हणाले.

मागील तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. या काळात कंपनीचा महसूल दोन टक्क्यांनी वाढून 81.45 कोटीवर पोहोचला, तर गेल्या डिसेंबर तिमाहीत तो 79.86 कोटी होता. शिवाय, मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 68 टक्क्यांनी वाढून 2.93 कोटी झाला आहे, जो मागील डिसेंबर तिमाहीत 1.74 कोटी होता. कंपनीमध्ये प्रमोटर्सची 70.45 टक्के भागीदारी आहे. त्याच वेळी, जनतेकडे 29.55 टक्के शेअर्स आहेत.

पवना इंडस्ट्रीजची स्थापना 1994 मध्ये झाली. ही कंपनी लॉक, ऑटो लॉक आणि ऑटो पार्ट्स बनवते आणि पुरवते. पीआयसी हा पवना ग्रुपचा एक भाग आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह पार्ट्स तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे जी ऑटोमोबाईल ऍप्लिकेशन्ससाठी सॉल्यूशन प्रदान करते.

या वर्षी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स सुमारे 19 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात या शेअरने 56 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 490 टक्के इतका मोठा नफा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT