this hotel stock will go up to Rs 220 experts are positive about the stock Sakal
Personal Finance

Investment Tips : 220 रुपयांपर्यंत जाईल 'हा' हॉटेल स्टॉक, स्टॉकबाबत तज्ज्ञ सकारात्मक...

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लेमन ट्री हॉटेल्सचे आकडे तिमाहीनंतर चांगले होत आहेत. येत्या काही वर्षांत जोरदार वाढ होईल असा विश्वास व्यवस्थापनाला वाटत आहे.

सकाळ वृत्तसेवा

हॉटेल स्टॉक लेमन ट्री सध्या खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. येत्या काळात हा शेअर चांगली वाढ नोंदवेल असेही शेअर मार्केट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे. त्यामुळेच या शेअर्समध्ये गुंतवणूक करुन गुंतवणूकदारांना भविष्यात या शेअरमध्ये मजबूत परतावा मिळू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लेमन ट्री हॉटेल्सचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञ संजीव होता यांनी दिला आहे. मिड साइज हॉटेल्समध्ये लेमन ट्री ही सर्वात मोठी चेन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दोन-तीन वर्षांत हा शेअर दुप्पट होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांनी 9 ते 12 महिन्यांच्या दृष्टीकोनातून हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरसाठीचे टारगेट 220 रुपये प्रति शेअर आहे. 25 जून 2024 रोजी स्टॉक 2.69 टक्क्यांनी वाढला आणि 150.85 रुपयांवर बंद झाला. या किमतीवर स्टॉक 45% पेक्षा जास्त परतावा देऊ शकतो असेही ते म्हणाले.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लेमन ट्री हॉटेल्सचे आकडे तिमाहीनंतर चांगले होत आहेत. येत्या काही वर्षांत जोरदार वाढ होईल असा विश्वास व्यवस्थापनाला वाटत आहे. कंपनीची बॅलेन्सशीट मजबूत होत आहे. ऑक्यूपेंसी वाढल्याने कॅश फ्लो वाढत आहे.

याचा परिणाम कर्जफेडीवर होईल. आर्थिक वर्ष 2028 पर्यंत कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होईल. एसेट लाइट प्लानमुळे त्यांचा विस्तार होत राहील. आताच्या स्थितीपासून पुढे हा शेअर चांगला परफॉर्म करु शकतो असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. लेमन ट्री हॉटेल्स अजूनही डिस्काउंटवर ट्रेड करत आहेत.

लेमन ट्री हॉटेल्सच्या स्टॉक कामगिरीवर नजर टाकली तर ती 3 महिन्यांत 14 टक्के आणि 6 महिन्यांत 25 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 मध्ये स्टॉक 27 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात स्टॉकचा परतावा 60 टक्के, 2 वर्षात 141 टक्के आणि 3 वर्षात 265 टक्के होता. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 158.05 रुपचे आणि निचांक 89.95 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 11,951.04 कोटी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT