NBFC Stock Sakal
Personal Finance

NBFC Stock : 2900 रुपयांवर जाईल 'हा' एनबीएफसी स्टॉक, 150% डिव्हिडेंडही मिळणार...

सकाळ वृत्तसेवा

NBFC Stock : श्रीराम फायनान्सच्या (Shriram Finance) शेअर्समध्ये सध्या चांगली तेजी दिसून येत आहे. अशात चौथ्या तिमाहीतील मजबूत कामगिरीनंतर ब्रोकरेज फर्म्स श्रीराम फायनान्सबाबत अतिशय पॉझीटीव्ह आहेत शिवाय त्यांनी शेअरसाठी मोठे टारगेट निश्चित केले आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 48.73% च्या वाढीसह 1945.87 कोटी होता.

तर नेट इंटरेस्ट इन्कम 20.02% ने वाढून 5336.0.6 कोटी झाला. गुंतवणूकदारांसाठी 150 टक्के डिव्हिडेंडही जाहीर करण्यात आला आहे. या आठवड्यात हा शेअर 2500 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. या वर्षी आतापर्यंत शेअरने 22 टक्के आणि 1 वर्षात 78 टक्के परतावा दिला आहे.

चोथ्या तिमाहीच्या निकालानंतर, नुवामा इन्स्टिट्यूशनने श्रीराम फायनान्स शेअर्सवर बाय रेटींग दिले आहे आणि टारगेट 2700 रुपयांवरून 2900 रुपयांपर्यंत वाढवले आहे. ब्रोकरेजने सांगितले की एयूएम आणि करपूर्व नफा अपेक्षेपेक्षा चांगला आहे. एनआयएम म्हणजेच नेट इंटरेस्ट मार्जिन देखील ठीक आहे.

असेट क्वॉलिटी सुधारली आहे. व्यवस्थापनाने 15% लोन ग्रोथचे गायडन्स ठेवले आहे, पण आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत काही दबाव दिसून येईल. क्रेडिट कॉस्ट आणि इंटरेस्ट मार्जिन स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.

श्रीराम फायनान्सने 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर 150 टक्के म्हणजेच 15 रुपये प्रति शेअर डिव्हिडेंडही जारी केला आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष 2024 मध्ये, कंपनीने 10 आणि 20 रुपये अंतरिम डिव्हिडेंड जारी केला होता.

आता संपूर्ण आर्थिक वर्षासाठी एकूण डिव्हिडेंडची रक्कम 450 टक्के म्हणजेच 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर 45 रुपये झाली आहे. 23 जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच 28 ऑगस्टपूर्वी डिव्हिडेंड शेअरहोल्डर्सच्या अकाउंटमध्ये पाठवले जातील.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT