BlackBuck IPO Sakal
Personal Finance

BlackBuck IPO : 'हा' स्टार्टअप लवकरच आणणार 550 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घेऊ...

सकाळ वृत्तसेवा

ट्रक ऍग्रीगेटर स्टार्टअप ब्लॅकबक (BlackBuck) लवकरच त्यांचा आयपीओ लॉन्च करणार आहेत. यासाठी त्यांनी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सादर केले आहे. कंपनीला या आयपीओ अंतर्गत सुमारे 550 कोटी उभे करायचे आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीचे सुमारे 9.63 लाख ट्रक ऑपरेटर आहेत. तर ऍक्सेल आणि फ्लिपकार्ट यांचीही ब्लॅकबकमध्ये गुंतवणूक आहे.

या आयपीओद्वारे, कंपनी ऑफर फॉर सेलअंतर्गत 21.6 मिलिअन शेअर्स जारी करेल. या अंतर्गत कंपनीचे सह-संस्थापक आणि प्रमोटर राजेश यबाजी त्यांचे 2.2 मिलिअन शेअर्स, चाणक्य हृदय त्यांचे 1.1 मिलिअन शेअर्सआणि रामा सुब्रमण्यम त्यांचे 1.1 मिलिअन शेअर्स विकतील.

इतकेच नाही तर या आयपीओअंतर्गत, ऍक्सेल, टायगर ग्लोबल आणि पीक एक्सव्ही पार्टनर्ससारखे मोठे गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीचा काही भाग विकतील. कंपनीचा सर्वात मोठा भागधारक ऍक्सेल आहे, ज्याचा सुमारे 14 टक्के हिस्सा आहे आणि 4.3 मिलियन शेअर्स विकणार आहेत.

सिंगापूरची क्विकरुट्स इंटरनॅशनल आपले 3.9 मिलिअन शेअर्स विकणार आहे. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनही 1.7 मिलिअन शेअर्स विकणार आहे. अमेरिकन कंपनी सँड्स कॅपिटल 1.3 मिलिअन शेअर्स विकण्याची योजना आखत आहे. टायगर ग्लोबल मॅनेजमेंट सुमारे 8.83 लाख शेअर्स, पीक XV पार्टनर्स सुमारे 6.40 लाख शेअर्स आणि बी कॅपिटल सुमारे 5.29 लाख शेअर्स विकू शकतात.

आयपीओमधून मिळालेल्या पैशांपैकी कंपनी सेल्स आणि मार्केटिंगवर सुमारे 200 कोटी खर्च करणार आहे. त्याच वेळी, कंपनीची उपकंपनी नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजेच एनबीएफसी ब्लॅकबक फिनसर्व्हमध्ये सुमारे 140 कोटीचा निधी गुंतवला जाईल. प्रोडक्ट डेवलपमेंटसाठीही सुमारे 75 कोटी खर्च केले जाणार आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT