This stock will give excellent returns in the next 6-12 months during the falling stock market Sakal
Personal Finance

Investment Tips : शेअर बाजाराच्या घसरणीत येत्या 6-12 महिन्यात 'हा' स्‍टॉक देईल उत्कृष्ट परतावा...

ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्टने एक्साईड इंडस्ट्रीजचे (Exide Industries) शेअर्स लाँग टर्मसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बुधवारी शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीही घसरला. या घसरत्या मार्केटमध्ये काही शेअर्स लाँग टर्मसाठी अतिशय चांगले आहेत. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्टने एक्साईड इंडस्ट्रीजचे (Exide Industries) शेअर्स लाँग टर्मसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या 2 वर्षांत या शेअरने जवळपास 100 टक्के परतावा दिला आहे.

ब्रोकरेजने या शेअरवर 6-12 महिन्यांसाठी 400 रुपयांचे टारगेट दिले आहे. 13 मार्च 2024 रोजी शेअर 300 रुपयांळीवर बंद झाला. अशाप्रकारे, सध्याच्या किमतीवरून या स्टॉकमध्ये सुमारे 34 टक्क्यांची वाढ मिळू शकते.

या शेअरने गेल्या 2 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तर स्टॉकमध्ये 1 वर्षात 68 टक्के आणि 6 महिन्यांत 12 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी, शेअरने इंट्राडेमध्ये 319.95 रुपयांचा हाय आणि 297.75 रुपयांचा लो बनवला.

इव्ही ट्रान्झिशनबाबत कमिटमेंट शिवाय त्याच्या लवकर आणि जलद विस्ताराचा कंपनीला फायदा होईल असे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. एक्साइड हे नवीन काळातील लिथियम आयन बॅटरीजमधील सुरुवातीच्या प्रवेशकर्त्यांपैकी एक आहे. यामुळे, ईव्ही ट्रान्झिशनच्या जोखमींना सामोरे जाण्यास ते अधिक सक्षम आहे. कंपनीची कॅपेक्स प्लान मजबूत आहे.

कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे आकडे उत्कृष्ट होते. आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा स्‍टँडअलोन रेवेन्‍यू 12.8% (YoY) वाढून 3,841 कोटी झाला. एबिटदा 440 कोटी नोंदवला गेला. तर एबिटदा मार्जिन 11.5 टक्के होते.

त्याचवेळी कंपनीने 240 कोटीचा नफा नोंदवला. वार्षिक आधारावर 8 टक्के वाढ झाली आहे. ऑटोमोबाईल्स व्यतिरिक्त, एक्साइड इंडस्ट्रीजला रिन्‍युएबल्‍स, टेलीकॉम, इंफ्रास्‍ट्रक्‍चर (वीज, रेल्वे इ.) मध्ये मोठ्या गुंतवणुकीचा फायदा होईल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT