Towards Building Robust NBFCs for Inclusive and High Economic Growth written by Umesh Revankar Sakal
Personal Finance

NBFC Company: सर्वसमावेशक आर्थिक वाढीसाठी मजबूत एनबीएफसी कंपन्या तयार करणे का गरजेचं आहे?

सकाळ वृत्तसेवा

लेखक - उमेश रेवणकर, कार्यकारी उपाध्यक्ष, श्रीराम फायनान्स:-

आरबीआयचा आर्थिक समावेशन निर्देशांक (फायनान्शिअल इन्कलुसिओन इंडेक्स - एफआय) वित्तीय वर्ष 2017 मधील 43.4 वरून वित्तीय वर्ष 2022-23 साठी 60.1 वर पोहचला आहे. यातून आर्थिक समावेशनाच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या अर्थात एनबीएफसी कंपन्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तंत्रज्ञानावर आधारित परिपूर्ण असे लवचिक व्यवसाय मॉडेल आणि जलद निर्णय घेण्याच्या चौकटीसह या एनबीएफसी कंपन्यांनी भारतात वित्तीय सेवांपासून वंचित असलेल्या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणाला उत्प्रेरित करण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्यायांची अंमलबजावणी केलेली आहे.

तथापि, एफआय निर्देशांक अशे दर्शवितो की, भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग अजूनही आर्थिक सेवेपासून वंचित आहे. जर भारताला सा ७% पेक्षा जास्त जीडीपी वृध्दी साध्य करायची असेल तर आगामी काळात एनबीएफसी कंपन्यांना त्यांची ही आर्थिक घौडदोड अशीच पुढे सुरु ठेवत आर्थिक समावेशात मोठी भूमिका बजावावी लागणार आहे.

अधिक सखोल पोहोच आणि विस्तार

एनबीएफसींनी आर्थिक समावेशनाला आणखी पुढे नेण्याचा त्यांचा सखोल कल दाखवून दिला आहे.  विशेषत: ग्रामीण आणि निम-शहरी भागात त्यांचा विस्तार लक्षणीयरीत्या वाढवला आहे. परिणामी, एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग), कृषी, स्टार्ट-अप,

उद्योजक, स्वयंरोजगार आणि वैयक्तिक कर्जाच्या शोधत असलेल्या ग्रामीण लोकसंख्येसह वाढत्या विभागांना कर्जाचे प्रमुख पुरवठादार म्हणून एनबीएफसी कंपन्यां उदयास आल्या आहेत. वित्तीय वर्ष 2022-23 आणि 2023-24 या कालावधीत बँकिंग क्षेत्राच्या कामगिरीवरील आरबीआयच्या अहवालात असे दिसून आले आहे की,

मार्च 2022 आणि मार्च 2023 पर्यंत बँकांद्वारे एमएसएमईंना दिल्या जाणाऱ्या कर्जात वार्षिक 12.7 आणि 12.4 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तर याच कालावधीत एनबीएफसीनी दिलेल्या कर्जात अनुक्रमे 21.2 आणि 42.4 टक्के वाढ झालेली आहे, म्हणजेच बँकांच्या तुलनेत एनबीएफसीकडून झालेला कर्जपुरवठा हा अंदाजे दुप्पट आहे.

प्रामुख्याने एनबीएफसीच्या नेतृत्वाखाली सूक्ष्मवित्त पुरवठ्यामध्ये उल्लेखनीय वाढ झालेली आहे. ज्यांना पूर्वी वित्तीय सेवांपासून वंचित ठेवण्यात आलेले होते, अशा व्यक्तींना एनबीएफसी क्षेत्राने कर्जपुरवठा आणि वित्तीय सेवांमध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहे. वित्तीय वर्ष 2023 मध्ये, सूक्ष्मवित्त पुरवठा उद्योगाच्या पोर्टफोलिओमध्ये एनबीएफसीचा एकूण  39.1 टक्के  वाटा असून तो बँकांच्या वाट्यापेक्षा अधिक ठरला आहे.

त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला पतपुरवठा करण्यातही एनबीएफसींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. एनबीएफसीचा कृषी कर्ज पोर्टफोलिओ वित्तीय वर्ष 2023 मधील दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारीच्या तुलनेत वित्तीय वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 43.7 टक्क्यांनी वाढलेला आहे.

निधीसाठी नवनवीन स्त्रोतांचे पाठबळ

अलिकडच्या वर्षांत, एनबएफसीने पारंपारिक पर्यायांच्या पलीकडे जात निधी उभारण्यासाठी त्यांच्या स्रोतात वैविध्यता आणताना नवीन मार्ग शोधले आहेत. आरबीआयच्या नियामक चौकटीमुळे आलेल्या सुलभतेचा लाभ घेत बँकांसोबत कर्जासाठी भागीदारी हा एनबीएफसीसाठी निधीचा एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून उदयास आला आहे.

या सहयोगांमुळे एनबीएफसीला बँकांकडे उपलब्ध असलेल्या अल्प किंमतीतील निधीचा फायदा उठवणे शक्य झाले आहे आणि त्यामुळे त्यांना आर्थिक सेवेपासून वंचित असलेल्या घटकांना कर्ज वितरीत करता येत आहे.

शिवाय अनुकूल नियामक धोरणे, भारताच्या मजबूत आर्थिक विकासाच्या शक्यतांमुळे अलीकडच्या वर्षांत एनबीएफसी क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे. सेवेपासून वंचित असलेल्या बाजारपेठेचा लाभ घेणे आणि आर्थिक समावेशनाला गती देण्याची एनबीएफसीची क्षमता ओळखून व्हेंचर कॅपिटल आणि खासगी इक्विटी कंपन्यांनी देखील एनबीएफसीमध्ये अधिकाधक गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखवलेली आहे.

धोरणांचे पाठबळ

एनबीएफसी क्षेत्राला स्थिरता आणि शाश्वतता प्रदान करण्याच्या उद्देशाने रिर्झव्ह बँकेने अलीकडच्या काळात जोखीम आधारित देखरेख चौकटीसह विविध नियामक सुधारणा लागू केल्या आहेत. याचबरोबर छोट्या व्यासायिकांसह प्राधान्य क्षेत्राला कर्जपुरवठ्यासाठी एनबीएफसीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपक्रम सुरु केले आहेत. 

अकाऊंट एग्रीगेटर नियमावली, प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमाय), आपतकालीन क्रेडिट लाइन हमी योजना (ईसीएलजीएस) तसेच निधी, कर आणि ट्रेडिंग बाजारपेठेसाठी डिजिटल मंच यासारख्या उपक्रमांमुळे एनबीएफसी कंपन्यांना कर्ज वितरीत करणे अधिक सोपे तसेच सोयीचे झालेले आहे. एनबीएफसीने या उपक्रमांचे फायदे सर्व व्यावसायिक विभागांपर्यंत पोहोचवले आहेत.

तांत्रिक प्रगतीः आविष्काराला पाठबळ

तांत्रिक प्रगतीने एनबीएफसीच्या विश्वात क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे ते अधिक कार्यक्षम आणि ग्राहक-केंद्रित सेवा देऊ शकतात. उदाहरणार्थ:

 डिजिटल ऑनबोर्डिंग आणि केवायसी: कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी करा‌व्या लागणाऱ्या धावपळीतुन सुटका तसेच वेळ वाचविण्यासाठी एनबीएफसी कंपन्या डिजिटल मंचाचा फायदा घेत ग्राहकांसाठी डिजिटल ऑनबोर्डिंग प्रक्रिया सुलभ करत आहेत. बायोमेट्रिक वेरिफिकेशन तसेच डिजिटल स्वाक्षरीचा वापर करत ग्राहकांच्या केवायसी प्रक्रियेमुळे अनुपालन आणखी सुनिश्चित होताना ग्राहकांचा अनुभवही वाढवत आहेत.

डेटा ॲनालिटिक्स आणि क्रेडिट स्कोअरिंग: कर्जासाठीच्या योग्यतेचे अधिक अचूक मूल्यांकन करण्यासाठी एनबीएफसी आता बिग डेटा आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमसारख्या तांत्रिक ताकदींचा वापर करत आहेत. ग्राहकांच्या आर्थिक व्यवहाराचा इतिहास, सोशल मीडियावरील त्यांच्या ॲक्टिव्हिटी आणि पर्यायी माहिती स्रोतांसह विविध माहिती संचांचे विश्लेषण करून सेवांपासून वंचित असलेल्या व्यक्ती आणि एमएसएमई यांना एनबीएफसी कर्ज देऊ शकतात.

मोबाइल बँकिंग आणि पेमेंटसाठीचे पर्याय: ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी मोबाइल बँकिंग ॲप्लिकेशन्स आणि डिजिटल पेमेंट पर्याय एनबीएफसी विकसित करत आहेत. हे मंच अनेक सुविधा देतात तसेच वित्तपुरवठ्यासाठी ग्राहकांना प्रवेशयोग्यताही देतात. त्यामुळे ग्राहकांना योग्य वित्त व्यवस्थापन आणि पेमेंट करता येतात. याचबरोबर कुठूनही आणि कधीही कर्ज सुविधा मिळवता येतात.

सुरक्षित व्यवहारांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान: एनबीएफसी कंपन्यां आर्थिक व्यवहारांची सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा शोध घेत आहेत. डिस्ट्रिब्युटेड लेजर तंत्रज्ञानाचा वापर करत एनबीएफसी फसवणूकीचे धोके कमी करू शकतात, व्यवहार खर्चही कमी करू शकतात आणि कर्ज वितरण आणि मालमत्ता व्यवस्थापन यासारख्या प्रक्रियांची कार्यक्षमता सुधारू शकतात.

एनबीएफसीसाठी भविष्यकालीन वाटचाल

वित्तीय साक्षरता सुधारण्यात आणि जबाबदार कर्ज आणि बचत वर्तन वाढविण्यात एनबीएफसी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. लोकांच्या जीवनात तंत्रज्ञानाची वाढती उपस्थिती त्यांना सायबर फसवणूक आणि अनैतिक घटकांमुळे असुरक्षित बनवू शकते  ज्यामुळे एनबीएफसी अधिक महत्त्वाच्या ठरतात.

प्रत्येक व्यक्तीला आर्थिक ज्ञानाने सक्षम केल्यास शाश्वत आणि जबाबदार आर्थिक वाढीची पुढील पातळी गाठली जाऊ शकते. . सेवांपासून वंचित असलेल्या विभागांच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करताना निधीच्या नवीन स्रोतांचा लाभ घेत, तांत्रिक प्रगतीला स्वीकारून आणि आर्थिक साक्षरतेला चालना देत एनबीएफसी सार्वत्रिक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्याlत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT