India Trade sakal
Personal Finance

Indian Trade : व्यापारी तूट नऊ महिन्यांच्या नीचांकी ; जानेवारी महिन्यात निर्यातीत ३.१२ टक्के वाढ

जानेवारी महिन्यात देशाची निर्यात ३.१२ टक्क्यांनी वाढून ३६.९२ अब्ज डॉलरवर गेली आहे, तर आयात वार्षिक तीन टक्क्यांनी वाढून ५४.४१ अब्ज डॉलरची झाली आहे. यामुळे जानेवारीमध्ये व्यापारी तूट १७.४९ अब्ज डॉलर झाली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जानेवारी महिन्यात देशाची निर्यात ३.१२ टक्क्यांनी वाढून ३६.९२ अब्ज डॉलरवर गेली आहे, तर आयात वार्षिक तीन टक्क्यांनी वाढून ५४.४१ अब्ज डॉलरची झाली आहे. यामुळे जानेवारीमध्ये व्यापारी तूट १७.४९ अब्ज डॉलर झाली. ही तूट गेल्या नऊ महिन्यांतील नीचांकी आहे. सरकारने आज ही आकडेवारी जाहीर केली.

एप्रिल-जानेवारी या आर्थिक वर्षात निर्यात ४.८९ टक्क्यांनी घसरून ३५३.९२ अब्ज डॉलर झाली, तर आयात ६.७१ टक्क्यांनी घसरून ५६१.१२ अब्ज डॉलरची झाली. यापूर्वीची सर्वांत कमी व्यापारी तूट एप्रिल २०२३ मध्ये १५.२४ अब्ज डॉलर होती. जानेवारी २०२३ मध्ये ती १७.०३ अब्ज डॉलर होती. जानेवारी महिन्यात कच्च्या तेलाची आयात ४.३३ टक्क्यांनी वाढून सुमारे १६.५६ अब्ज डॉलरची झाली आहे, तर जानेवारीमध्ये सोन्याची आयात सुमारे १७४ टक्क्यांनी वाढून १.९ अब्ज डॉलरवर पोहोचली, असेही सरकारी आकडेवारीवरून समोर आले आहे.

लाल समुद्रातील संकटाबाबत निर्यातदार, संबंधित मंत्रालये आणि भागधारकांसोबत तीन बैठका घेतल्याचेही यावेळी बर्थवाल यांनी सांगितले. या कठीण परिस्थितीत निर्यातदारांना मार्गक्रमण करण्यास मदत करणे हा यामागचा उद्देश होता. निर्यातदारांना सध्याच्या या परिस्थितीत जास्तीत जास्त क्रेडिट दिले जाऊ शकते ते द्यावे, असे आम्ही बँकांना सांगत आहोत. एक्झिम बँक आणि ईसीजीसीला विमा प्रीमियम दर वाढवू नका असेही सांगण्यात आले होते. या सकारात्मक वातावरणामुळे निर्यात वाढीला चालना मिळण्यास मदत झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. जागतिक निर्यातीत भारताचा हिस्सा वाढत आहे, असेही वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

जानेवारी महिन्यात पोलाद, मसाले, तेल जेवण, तेलबिया, गालिचे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चहा, औषधी, पेट्रोलियम उत्पादने, कॉफी, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनांसह ३० प्रमुख क्षेत्रांपैकी १८ क्षेत्रांमध्ये निर्यातीत सकारात्मक वाढ दिसून आली. जानेवारी २०२३ मधील २८ अब्ज डॉलरच्या तुलनेत सेवा क्षेत्राच्या निर्यातीचे अंदाजे मूल्य जानेवारीत ३२.८ अब्ज डॉलरपर्यंत वाढले. लाल समुद्रातील संकट, प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वस्तूंच्या किमतीत घसरण झालेली असूनही भारताने जानेवारीमध्ये व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत सकारात्मक वाढ नोंदवली आहे.

- सुनील बर्थवाल, वाणिज्य सचिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

Junior National Kho Kho Championship स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे कर्णधार

SCROLL FOR NEXT