transport issue decreases in import and export trade loss of 15 billion dollars Sakal
Personal Finance

भू-राजकीय समस्यांमुळे जागतिक पातलीवर मालवाहतुकीत अडथळे येत असल्याने व्यापारी मालाच्या आयात-निर्यातीत घट

भू-राजकीय समस्यांमुळे जागतिक पातलीवर मालवाहतुकीत अडथळे येत असल्याने आयात-निर्यातीत घट झाली आहे. त्यामुळे या महिन्यात व्यापारी तूट १५.६ अब्ज डॉलर झाली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भू-राजकीय समस्यांमुळे जागतिक पातलीवर मालवाहतुकीत अडथळे येत असल्याने आयात-निर्यातीत घट झाली आहे. त्यामुळे या महिन्यात व्यापारी तूट १५.६ अब्ज डॉलर झाली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

देशातून होणाऱ्या व्यापारी मालाच्या निर्यातीत मार्चमध्ये किरकोळ घट झाली असून, ती ४१.६८ अब्ज डॉलरची आहे. संपूर्ण २०२३-२४ या वर्षात निर्यात वार्षिक ३.११ टक्क्यांनी घसरून ४३७ अब्ज डॉलरची झाली आहे. आयातही ५.९८ टक्क्यांनी कमी होऊन ५७.२८ अब्ज डॉलरवर आली आहे.

वर्ष २०२३-२४ मध्ये आयात ६७७.२४ अब्ज डॉलर होती. मागील वर्षातील ७१५.९७ अब्ज डॉलरपेक्षा ती ५.४१ टक्क्यांनी कमी आहे. व्यापारी तूट २४०.१७ अब्ज डॉलर आहे, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी आज येथे ही माहिती दिली.

आखाती देशांतील तणाव वाढत आहे, त्यावर वाणिज्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे आणि योग्य कारवाई करेल, असे बर्थवाल यांनी सांगितले. मात्र, सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेमुळे त्यांनी सविस्तर खुलासा केला नाही. व्यापारी आणि सेवा क्षेत्राची मिळून एकूण निर्यात गेल्या वर्षीच्या सर्वोच्च विक्रमाला मागे टाकण्याचा अंदाज आहे, असे सचिवांनी सांगितले.

निर्यात २०२२-२३ मधील ७७६.४० अब्ज डॉलरच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ७७६.६८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मार्च २४ मध्ये ४१.६८ अब्ज डॉलरची सर्वाधिक मासिक व्यापारी निर्यात झाली.

२०२३-२४ मधील व्यापारी मालाच्या निर्यातीतील वाढीला चालना देणाऱ्या घटकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधे, अभियांत्रिकी वस्तू, लोहखनिज, हातमाग उत्पादने, सिरॅमिक उत्पादने आणि काचेच्या वस्तू यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात २०२२-२३ मधील २३.५५ अब्ज डॉलरवरून २३.६४ टक्क्यांनी वाढून २०२३-२४ मध्ये २९.११२ अब्ज डॉलर झाली.

औषधे निर्यात २०२२-२३ मधील २५.३९ अब्ज डॉलरवरून ९.६७ टक्क्यांनी वाढून २७.८५ अब्ज डॉलर झाली. अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात २.१३ टक्क्यांनी वाढून १०९.३२ अब्ज डॉलरची झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT