Tupperware files for bankruptcy  Sakal
Personal Finance

Tupperware Bankruptcy: आईचं लाडकं टप्परवेअर आलं अडचणीत? दिवाळखोरी केली जाहीर, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Tupperware Company: टप्परवेअर वेअर कंपनी हे किचनवेअर विभागातील मोठे नाव आहे. कंपनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या व इतर वस्तू बनवते. मात्र आता कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कंपनीच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.

राहुल शेळके

Tupperware Company: टप्परवेअर कंपनी हे किचनवेअर विभागातील मोठे नाव आहे. कंपनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या व इतर वस्तू बनवते. मात्र आता कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कंपनीच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.

यामुळे कंपनीवर सुमारे 70 कोटी डॉलर (सुमारे 5,860 कोटी रुपये) कर्ज झाले आहे. कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, या कंपनीने तिच्या काही उपकंपन्यांसह अमेरिकेत दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.

टप्परवेअर या बाटली आणि टिफिन बनवणाऱ्या कंपनीची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ही कंपनी आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. मंगळवारी कंपनीच्या काही सहायक कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.

कोविडमुळे कंपनीची स्थिती बिघडली

कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरी ॲन गोल्डमन म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आव्हानात्मक मॅक्रो इकॉनॉमिक समस्यांमुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे.

विशेषत: कोविडच्या काळात या कंपनीची अवस्था बिकट झाली आहे, ज्यातून ती अद्याप सावरू शकलेली नाही. कोविडनंतर कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीत मोठी घट झाली.

कोविडनंतर, प्लॅस्टिक सारख्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, कामगार आणि मालवाहतुकीचा खर्चही वाढला, कंपनीचे मार्जिन आणखी कमी झाले, ज्यामुळे कंपनीच्या ताळेबंदावर परिणाम झाला आणि तिची आर्थिक स्थिती बिघडली.

टप्परवेअर 77 वर्षे जुनी कंपनी

अमेरिकन टिफिन बॉक्स टप्परवेअर कंपनी 1946 मध्ये सुरू झाली. केमिस्ट एस टपर यांच्या लक्षात आले की अन्नपदार्थ व्यवस्थित साठवले जात नसल्यामुळे खराब होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांचे पैसे वाचवण्यासाठी आणि जेवणाची समस्या दूर करण्यासाठी त्यांनी टिफिन बॉक्स बनवण्याचा विचार केला.

काही काळातच त्यांनी एक मोठी कंपनी स्थापन केली. या कंपनीने वेळ, पैसा, जागा, अन्न आणि उर्जेची बचत करण्यासाठी क्रांतिकारी बदल केले, ज्यामुळे कंपनीची लोकप्रियता वाढत गेली आणि कंपनी जगभरात लोकप्रिय झाली.

ही कंपनी प्लास्टिक टिफिन, वाट्या आणि बाटल्या बनवते. कंपनीचा व्यवसाय जगभरातील 70 देशांमध्ये पसरला होता, परंतु आता टप्परवेअर कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि आर्थिक समस्यांना तोंड देत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT