TV Channel Rates Sakal
Personal Finance

TV Channel Rates: 'अब की बार महंगाई की मार'; आता टीव्ही पाहणेही होणार महाग, चॅनलचे दर लवकरच वाढणार

राहुल शेळके

TV Subscription Rate: टीव्हीलाही महागाईचा फटका बसणार आहे. लवकरच तुम्हाला टीव्ही पाहण्यासाठी तुमच्या खिशातून जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. डिस्ने स्टार, वायकॉम18, झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने त्यांचे दर वाढवले ​​आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. टीव्ही सबस्क्रिप्शनचे दर 5 ते 8 टक्क्यांनी वाढू शकतात. ट्रायने दर वाढवण्यासाठी लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबण्यास सांगितले होते. आता लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यामुळे टीव्ही चॅनेल्सचे दर कधीही वाढू शकतात.

ट्रायने लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या

सर्व ब्रॉडकास्टिंग कंपन्यांनी डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर (डीपीओ) ला नवीन करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. यानंतर, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सर्व प्रसारकांना लोकसभा निवडणुकीपर्यंत करारावर स्वाक्षरी न करणाऱ्यांचे सिग्नल बंद करू नयेत, असे सांगितले होते. आता ट्राय कधीही त्याला मान्यता देऊ शकते.

जानेवारीमध्ये ब्रॉडकास्टर्सने दर 10 टक्क्यांनी वाढवले ​​होते

या वर्षी जानेवारीमध्ये, सर्व मोठ्या प्रसारकांनी त्यांच्या चॅनेलच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. Viacom 18 ने कमाल 25 टक्क्यांनी दर वाढवले ​​आहेत. क्रिकेटचे हक्क आणि मनोरंजन वाहिन्यांच्या बाजारपेठेतील वाटा वाढल्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे.

फेब्रुवारीपासूनच नवे दर लागू झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतदान 1 जून रोजी पूर्ण झाले. याशिवाय 4 जून रोजी निवडणुकीचे निकालही आले आहेत. अशा परिस्थितीत आता सर्व प्रसारक डीपीओवर दर वाढवण्यासाठी दबाव आणतील. एअरटेल डिजिटल टीव्हीने आधीच दर वाढवले ​​आहेत. उर्वरित डीपीओ देखील लवकरच ग्राहकांवर वाढीव दराचा बोजा टाकू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT