two new facilities on Income Tax Portal Sakal
Personal Finance

प्राप्तिकर पोर्टलवरील दोन नव्या सुविधा

आता या त्रुटीवर मात करण्यासाठी ‘एआयएस’मध्ये प्राप्तिकर विभागाने संकलित केलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर प्रतिक्रिया (फीडबॅक) देण्याची सुविधा करदात्याला प्रदान करण्यात आली

सीए डॉ. दिलीप सातभाई

सर्व नोंदणीकृत प्राप्तिकरदात्यांना वार्षिक माहिती विवरणपत्र (एआयएस) पोर्टलवर उपलब्ध आहे. यात करदात्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांचे तपशील प्राप्तिकर विभागास ज्ञात आहेत, असे समजले जाते. ही माहिती देश-विदेशातील एकाधिक माहितीस्रोतांकडून मिळालेल्या आर्थिक डेटाच्या आधारावर तयार केलेली असते.

तथापि, कधी कधी काही करदात्यांच्या बाबतीत ही माहिती अर्धवट किंवा चुकीची किंवा दोनदा विचारात घेतलेली असते, त्यामुळे ती करदात्यांना मान्य नसते, असे आढळून आले आहे. त्यामुळे ‘एआयएस’मधील आर्थिक माहिती सतत चर्चेत असते.

आता या त्रुटीवर मात करण्यासाठी ‘एआयएस’मध्ये प्राप्तिकर विभागाने संकलित केलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर प्रतिक्रिया (फीडबॅक) देण्याची सुविधा करदात्याला प्रदान करण्यात आली आहे. विभागाची माहिती चुकीची असल्यास ती खोडून काढून करदात्याने दिलेली माहिती त्यांच्या पुष्टीकरणासाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय मूळ स्रोताकडे पाठविली जाणार असल्याने प्रथमच व्यवहार्य उपाययोजना आणली गेली आहे.

आता या सुविधेमुळे करदात्याच्या प्रतिक्रियेवर मूळ स्रोताद्वारे कारवाई केली गेली आहे की नाही, हेदेखील समजणार आहे. परिणामी, करदात्याने दिलेली माहिती अंशतः किंवा पूर्णतः स्वीकारली आहे वा नाकारली आहे, हेदेखील समजेल.

थोडक्यात करदात्याची माहिती योग्य असेल आणि स्रोताने ती सुधारित माहिती पुन्हा ‘एआयएस’मध्ये पुरविली आहे की नाही, हे आता तारखेसह समजणार आहे. या सुविधेत ज्या तारखेला प्रतिक्रिया शेअर केली आहे ती तारीख आणि ज्या तारखेला मूळ रिपोर्टिंग स्रोताकडून शेअर केलेल्या प्रतिक्रियेवर प्रतिसाद दिला आहे, ती तारीखही समजणार आहे.

करदात्याच्या प्रतिसादावर प्राप्तिकर विभाग अवलंबून राहणार आहे, की त्यात काही सुधारणा आवश्यक आहेत, याची माहिती समजल्याने विवरणपत्र भरताना विचार करता येईल. त्यामुळे करदाते व प्राप्तिकर विभाग यांच्यातील असणारे दुमत कमी होण्यास मदत होणार असून, करविभागाचा अशा प्रकरणात पाठपुरावा जाणारा वेळ वाचणार आहे.

ई-प्रक्रिया टॅबमधील बदल

प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर एक नवा ‘ई-प्रक्रिया’ टॅब सुरू करण्यात आला आहे, यामुळे करदात्यांना प्राप्तिकर विभागाच्या पत्रांना, नोटिसांना, सूचनांना प्रतिसाद देणे सोपे होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून प्राप्तिकर विभागाने अद्ययावत व वेगवान नॅव्हिगेशन पद्धती आचरणात आणली असून, स्वतंत्र पृष्ठे आणि सुधारित फिल्टर प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे करदात्यांना प्रतिसादासाठी आवश्यक विशिष्ट कार्यवाही शोधणे आणि व्यवस्थापित करणे सहज शक्य होणार आहे.

नवी सुविधा

करदात्यांना त्यांची करप्रक्रिया जलद शोधण्यात मदत करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टलमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत.

कमी स्क्रोलिंग

प्राप्तिकर विभागाने स्वतंत्र पृष्ठे सुरू केली आहेत, त्यामुळे यापुढे विशिष्ट प्रतिसादासाठी करावी लागणारी कार्यवाही शोधण्यासाठी सतत स्क्रोल करण्याची गरज नाही. या बदलापूर्वी, एकाधिक कार्यवाहींमधून नेव्हिगेट करणे कंटाळवाणे होते आणि तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

सुधारित फिल्टर

नवे फिल्टर करदात्यांना पुढील स्थिती, मूल्यांकन वर्ष, कार्यवाहीची तारीख, सूचना तारीख आणि इतर निकषांनुसार शोधून देऊ शकतील. अशा प्रकारे, करदाता आवश्यक असलेल्या प्रतिसादासाठी कार्यवाही त्वरीत शोधू शकेल.

पूर्वी, जेव्हा करदात्याने ‘फिल्टर’

क्लिक केले, तेव्हा त्यांना मूल्यांकन वर्ष आणि कार्यवाहीची स्थिती निवडायची

होती. करदाते किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी प्राप्तिकर कायदा, १९६१ अंतर्गत अनेक

बाबीत करावयाची कार्यवाही अधिक सहजपणे समजून घेण्यासाठी आणि

व्यवस्थापित करण्यासाठी एकाधिक पर्याय निवडू शकतात.

‘ई-प्रोसिडिंग’ टॅब कसा वापरावा

प्रथम, ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

‘पेंडिंग ॲक्शन’ टॅबवर जा आणि ‘ई-प्रोसिडिंग’वर क्लिक करा.

कोणतीही ‘ई-प्रक्रिया’ नसल्यास, पृष्ठ रिकामे असेल. काही प्रलंबित असल्यास ते सूचीबद्ध केले जातील. तुम्हाला आवश्यक असलेली कार्यवाही शोधण्यासाठी आणि निवडण्यासाठी तुम्ही फिल्टर वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

Raj Thackeray: मुंबईत मनसे फॅक्टर ठरणार निर्णायक; बदललेली भूमिका वाढवतेय महायुतीची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT