UK Economy In Recession In Second Half Of 2023 Sakal
Personal Finance

UK Economy: पीएम ऋषी सुनक चिंतेत! इंग्लंडमध्ये मंदीचे सावट; भारताला धोका आहे का?

Recession in UK: युरोपमधील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या ब्रिटन गेल्या वर्षी जुलै 2023पासून आर्थिक मंदीचा सामना करत आहे. 2023 च्या शेवटच्या तीन महिन्यांत ब्रिटनमधील उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्याने देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत गेली आहे.

राहुल शेळके

Recession in UK: युरोपमधील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेला ब्रिटन गेल्या जुलै 2023पासून आर्थिक मंदीचा सामना करत आहे. 2023 च्या शेवटच्या तीन महिन्यांत ब्रिटनमधील उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्याने देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत गेली आहे.

अर्थशास्त्रज्ञांच्या रॉयटर्सच्या सर्वेक्षणात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) मध्ये 0.1% ची किरकोळ घट झाली आहे. बँक ऑफ इंग्लंडने म्हटले आहे की 2024 मध्ये अर्थव्यवस्थेत वाढ होईल अशी अपेक्षा आहे. (After Japan, the UK faces a slowdown; slipped into technical recession in second half of last year)

सेवा, औद्योगिक उत्पादन आणि बांधकाम या तीनही प्रमुख क्षेत्रांत घसरण झाली आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा घसरण जास्त आहे. यामुळे गेल्या तिमाहीत आर्थिक वाढीमध्ये 0.1 टक्के घसरण झाली आहे.

महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढवल्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2020 च्या पहिल्या सहामाहीनंतर ब्रिटीश अर्थव्यवस्थेने पहिल्यांदाच मंदीत प्रवेश केला. त्यानंतर कोविड-19 महामारीच्या काळात उत्पादनात घट झाली. (UK economy falls into recession, adding to PM Rishi Sunak's election challenge)

ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने (ओएनएस) म्हटले आहे की नोव्हेंबरमध्ये 0.2% वाढीनंतर आर्थिक उत्पादन डिसेंबरमध्ये मासिक आधारावर 0.1% घसरले आहे. रॉयटर्स पोलने डिसेंबरमध्ये 0.2% घसरण दाखवली होती.

जपानमध्येही मंदीचे सावट

काही दिवसांपूर्वीच जपानची अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत लोटल्याचेही वृत्त आले. खराब कामगिरीमुळे जपानने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे बिरुद गमावले आहे.

आता जर्मनीने जपानचे स्थान घेतले आहे. सरकारी डेटानुसार देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) मागील तिमाहीत 3.3% च्या घसरणीनंतर ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत वार्षिक आधारावर 0.4% ने घसरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्यात राज ठाकरे सभा घेणार

TET Exam : टीईटी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर; डमी उमेदवारी रोखण्यासाठी फेस रीडिंग यंत्र बसविणार

Starlink India: इलॉन मस्क यांचं स्टारलिंक भारतात इंटरनेट क्षेत्रात करणार धमाका? ट्रम्प यांच्यासह भारत सरकारचे संकेत

DY Chandrachud: आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चंद्रचूडांच्या पिठासमोर होण्याची शक्यता मावळली, आता...

"आम्हाला कधीच मूल नको हवं होतं" लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्रीच्या दाव्याने सगळ्यांना बसला धक्का ; म्हणाली...

SCROLL FOR NEXT