UK Recession: ब्रिटनबाबत सध्या एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 दरम्यान घसरण झाली होती.
जीडीपीमध्ये मोठी घसरण घट
ब्रिटनचे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की, बँक ऑफ इंग्लंड व्याजदरात कपात करू शकते जेणेकरून विकासाला गती मिळू शकेल.
ओएनएस (नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस) ने जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ब्रिटनच्या जीडीपीमध्ये म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनात 0.1% ची घसरण झाली आहे.
ओएनएसने जारी केलेला आणखी एक डेटा सांगतो की नोव्हेंबरमध्ये अर्थव्यवस्थेत किरकोळ विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि ही वाढ तज्ञांच्या अंदाजापेक्षा खूपच चांगली आहे.
ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये किरकोळ विक्रीत 1.3% वाढ झाली आहे. परंतु नोव्हेंबरमधील विक्री अद्याप प्री-कोविड पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. नोव्हेंबरमधील किरकोळ विक्री ही सर्वात कमी पातळीवर आहे.
बँक ऑफ इंग्लंडचे म्हणणे आहे की, व्याजदर कपातीबद्दल बोलण्याची ही योग्य वेळ नाही. ब्रिटनच्या महागाई वाढीचा वेग थोडा मंदावला आहे असे दिसते आणि यामुळे बँक आगामी काळात व्याजदरात कपात करू शकते.
ब्रिटनमध्ये व्याजदर सध्या केवळ 5.25% आहे आणि हा 15 वर्षांतील आत्तापर्यंतचा उच्चांक आहे. दुसरीकडे, ब्रिटनचे अर्थमंत्री हंट म्हणतात की, या आकड्यांवर नजर टाकल्यानंतर अर्थव्यवस्थेची स्थिती तितकी वाईट नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.