Birmingham Declares Itself Bankrupt: ब्रिटनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे, बर्मिंगहॅम सिटी दिवाळखोर झाली आहे. ब्रिटनमधले हे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. स्वतः बर्मिंगहॅम सिटी कौन्सिलने हे मान्य केले असून मंगळवारी कलम 114 ची नोटीस दाखल केली आहे. या सूचनेनुसार शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खर्चावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे.
तिथल्या नगर परिषदेने दाखल केलेल्या नोटीसमध्ये याचे कारण सांगितले आहे. समान वेतनाच्या खर्चामुळे सध्या ही आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
स्पष्टपणे सांगायचे तर, बर्मिंगहॅम सिटी कौन्सिलने आर्थिक संसाधनांपेक्षा जास्त खर्च केला आहे. यामुळेच शहराने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खर्चावर तातडीने बंदी घातली आहे.
2023-2024 आर्थिक वर्षासाठी, शहराची अंदाजे £87 दशलक्ष (109 दशलक्ष डॉलर) तूट आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, बर्मिंगहॅम सिटी कौन्सिल दहा लाखांहून अधिक लोकांना सेवा पुरवते.
ब्रिटनमधील या सर्वात मोठ्या बहुसांस्कृतिक शहराने गेल्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सखेळांचे आयोजन केले होते. आता शहराच्या आर्थिक परिस्थितीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
बर्मिंगहॅम नगर प्रशासनावर मजूर पक्षाची सत्ता आहे. 100 हून अधिक नगरसेवकांचा समावेश असलेले हे युरोपमधील सर्वात मोठे स्थानिक प्राधिकरण आहे. याची लोकसंख्या दहा लाखांहून अधिक आहे.
कौन्सिलचे उपनेते शेरॉन थॉम्पसन यांनी ब्रिटनच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षावरही आरोप केले आहेत आणि असे म्हटले की, बर्मिंगहॅममध्ये 1 अब्ज पौंड निधी कंझर्व्हेटिव्ह सरकारांनी काढून घेतला. कौन्सिल आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. शहर अजूनही व्यवसायासाठी खुले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.