Nirmala Sitharaman announcements on road development 
Personal Finance

Budget 2024: निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या एक्स्प्रेस-वेची घोषणा, गंगा नदीवर दोन लेन ब्रीज बनवला जाणार

FM Nirmala Sitharaman Union Budget 2024-25 Speech LIVE in Marathi: अर्थसंकल्पात काय घोषणा करतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. रस्ते वाहतूक मंत्रीपद महाराष्ट्राच्या नितीन गडकरी यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रालयाला काय मिळते याकडे लक्ष लागून होतं.

कार्तिक पुजारी

Union Budget 2024 Nirmala Sitharaman announcements on road development: पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सितारमण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या अर्थसंकल्पात काय घोषणा करतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. रस्ते वाहतूक मंत्रीपद महाराष्ट्राच्या नितीन गडकरी यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रालयाला काय मिळते याकडे लक्ष लागून होतं.

रस्ते कनेक्टिव्हिटिचे आम्ही समर्थन करतो. या अनुषंगाने पाटना ते पुर्णिया एक्स्प्रेस-वे, बोधगया-राजगीर-वैशाली-दरबंगा एक्स्प्रेस-वे, बक्सर-बागलपूर एक्स्पेस-वे बांधले जाणार आहेत. अतिरिक्त दोन लेन पूल बक्सर येथे गंगा नदीवर बनवला जाणार आहे. यासाठी २६ हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे, असं निर्मता सीतारमण यांनी सांगितलं.

पायाभूत सुविधासाठी ११ लाख कोटींचा निधी गेला आहे. देशातील २५ हजार गावे पक्क्या रस्त्याने जोडली जाणार आहेत. अर्थमंत्री निर्मता सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात २६ हजार कोटींचे नवे रस्ते बांधले जाणार आहेत. आंध्र प्रदेशला पायाभूत सुविधांसाठी १५ हजार कोटी तर बिहारच्या पायभूत सुविधांसाठी २६ हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर मोदी सरकारचा भर असेल. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बत ११ लाख कोटी रुपये देणार. जीडीपीच्या ३.४ टक्के पायाभूत सुविधांसाठी वापरला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT