Budget 2024 Bihar And Andhra Pradesh Esakal
Personal Finance

Union Budget 2024: मोदी सरकारची लाडके मित्र योजना! नितीश कुमार, चंद्राबाबूंच्या राज्यांवर ४० हजार कोटींचा वर्षाव

Special Package For Bihar And Andhra Pradesh in Union Budget 2024-25: एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला.

आशुतोष मसगौंडे

Special Package For Bihar And Andhra Pradesh: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळवता आली नाही. त्यानंतर आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसम आणि बिहारमधील नितिश कुमारांच्या संयुक्त जनता दलाने दिलेल्या पाठिंब्यामुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि एनडीएचे सरकार अस्तित्त्वात आले.

एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यामध्ये चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

बिहारची चांदी

अर्थमंत्री सीतारामन यांनी बिहारला आर्थिक मदत जाहीर केली. बिहारच्या गयामध्ये आम्ही औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पूर्व विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासातही आम्ही सहकार्य करू. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल बांधला जाणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, बिहारमधील पीरपेंटी येथे नवीन 2400 मेगावॅट ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये आणि क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. बहुपक्षीय विकास बँकांकडून बाह्य सहाय्यासाठी बिहार सरकारच्या विनंत्यांची त्वरीत प्रक्रिया केली जाईल.

आंध्र प्रदेशला काय मिळाले?

सरकारने अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशलाही मोठा भेट दिली आहे. पुनर्रचनेच्या वेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशसाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात राज्याच्या भांडवलाची गरज मान्य केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT