Union Budget 2024  esakal
Personal Finance

Union Budget 2024 Capital Gains Tax: लाँग टर्म कॅपिटल म्हणजे काय? अर्थसंकल्पात कोणते बदल झाले ज्यामुळे शेअर बाजार कोसळला?

What is Long Term Capital : अर्थसंकल्पाने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. कॅपिटल गेन टॅक्स अंतर्गत, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 12 टक्के करण्यात आला आहे.

Sandip Kapde

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पामुळे शेअर कोसळला. निर्मला सीतारमण यांनी कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gains Tax) अंतर्गत लाँग टर्म कॅपिटल गेन मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. हे वाढवून 12.50 टक्के केले गेले आहे, जे आधी 10 टक्के होते. याच कारणास्तव शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय?-

सर्वात मोठा प्रश्न आपल्या मनात येतो की कॅपिटल गेन टॅक्स (भांडवली नफा कर) म्हणजे काय? आपल्या कॅपिटलवर जो नफा होतो आणि त्या नफ्यावर जो टॅक्स लावला जातो, त्याला कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात. हे कॅपिटल कोणत्याही प्रकारची मालमत्ता किंवा शेअर्सचा स्टॉक असू शकतो. कॅपिटल गेन टॅक्स दोन प्रकारचा असतो: शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स.

लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स काय असतो?-

शॉर्ट टर्मच्या उलट, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे. यानुसार जर तुम्ही कोणताही स्टॉक 1 वर्षानंतर विकता आणि त्यावर जो नफा होतो, त्या नफ्यावर लावला जाणारा टॅक्स लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून ओळखला जातो. या बजेटमध्ये यामध्ये बदल करण्यात आला आहे. वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये जाहीर केले आहे की आता लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 12.50 टक्क्यांच्या दराने द्यावा लागेल.

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स कशावर लागू होतो?-

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स कशावर लागू होतो. जर तुम्ही कोणताही स्टॉक खरेदी करता आणि तो 1 वर्षाच्या आत विकता, तर त्या स्टॉकवर झालेल्या नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. एक लाख रुपयांपर्यंतच्या नफ्यावर टॅक्स लागत नाही आणि जर यापेक्षा जास्त नफा होतो तर त्यावर 10 टक्क्यांच्या दराने टॅक्स द्यावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतसाठी खजिना उघडणारा लखनऊ सुपर जायंटचा मालक कोण? किती आहे संपत्ती?

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT