United Nations revises forecasts says India's economy to grow by 6-9 percent in 2024  Sakal
Personal Finance

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Indian Economic Growth: संयुक्त राष्ट्रांनी 2024 साठी भारताचा आर्थिक विकास दर 6.9 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, UN ने 2024 साठी भारताची GDP वाढ 6.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

राहुल शेळके , दीपक सावते

Indian Economic Growth: संयुक्त राष्ट्रांनी 2024 साठी भारताचा आर्थिक विकास दर 6.9 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, UN ने 2024 साठी भारताची GDP वाढ 6.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मोठी सार्वजनिक गुंतवणूक आणि खाजगी उपभोग यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तेजीत राहील, असे संयुक्त राष्ट्राने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी '2024 च्या मध्यापर्यंत जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना' या विषयावर अहवाल प्रसिद्ध केला.

2024 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?

2024 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 2.7 टक्के वाढण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. हा अंदाज यूएस आणि ब्राझील, भारत आणि रशियासह अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील चांगल्या कामगिरीचे संकेत आहेत.

UN च्या 'ग्लोबल इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स 2024' मधील नवीन अंदाजानुसार, या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था 2.7 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. जानेवारीच्या अहवालात तो 2.4 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज होता.

अहवालात म्हटले आहे की 2025 मध्ये 2.8 टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. 2024 मध्ये 2.7 टक्के वाढीचा अंदाज 2023 मधील वाढीच्या बरोबरीने आहे, जरी 2020 मध्ये कोविड-19 सुरू होण्यापूर्वीच्या तीन टक्के वाढीच्या दरापेक्षा कमी आहे.

यूएन इकॉनॉमिक ॲनालिसिस अँड पॉलिसी डिव्हिजनचे संचालक शंतनू मुखर्जी यांनी अहवाल सादर करताना पत्रकार परिषदेत सांगितले की, "आमचे अंदाज आशावादाने भरलेले आहेत."

राजकीय तणाव आर्थिक विकासाला आव्हान देऊ शकतात

विकसनशील अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा वेगाने वाढत आहेत. अहवालात असे म्हटले आहे की विकसनशील देशांमध्ये वाढ एकसारखी नाही. त्यात म्हटले आहे की भारत, इंडोनेशिया आणि मेक्सिकोसारख्या मोठ्या विकसनशील अर्थव्यवस्थांना देशांतर्गत आणि बाह्य मागणीचा फायदा होत आहे, तर अनेक आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन अर्थव्यवस्था राजकीय अस्थिरता, कर्ज खर्च आणि विनिमय दरांमुळे मागे पडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT