UPS Layoffs: युनायटेड पार्सल सर्व्हिस (UPS) मध्ये मोठी नोकर कपात होणार आहे. यूपीएस 12,000 नोकऱ्या कमी करेल. कंपनीचे सीईओ कॅरोल टोम यांनी सांगितले की यामुळे कंपनीचा सुमारे 1 बिलियन डॉलर्स खर्च वाचेल. यूपीएसच्या या निर्णयामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक बेरोजगार होणार आहेत. जो नोकऱ्यांबाबत लोकांसाठी चिंतेचा विषय आहे.
कंपीनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. 2023 हे एक कठीण वर्ष होते. या सर्व गोष्टींद्वारे आम्ही काय नियंत्रित करू शकतो यावर लक्ष केंद्रित केले. रणनीतीवर राहिलो आणि भविष्यातील वाढीसाठी आमचा पाया मजबूत केला, असे कंपनीचे सीईओ कॅरोल टोम यांनी म्हटले आहे.
कंपनीचे सीईओ कॅरोल टोम यांनी तिमाही कमाई कॉलवर स्टॉक होल्डर्सना सांगितले की ते नीवन योजना आखत आहेत. तसेच कंपीनीला एका साचात बसून काम करणार आहेत. तसचे संसाधनांचा योग्य वापर करणार आहेत.
सीईओ कॅरोल टोम गेल्यावर्षी वादग्रस्त युनियन चर्चेदरम्यान गमावलेला व्यवसाय परत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरुवातीच्या यूएस ट्रेडिंगमध्ये शेअर्स 7.6 टक्के इतके घसरले.
वार्षिक विक्रीत 9.3 टक्के घसरण नोंदवल्यानंतर, UPS ने 2024 मध्ये 1.1 टक्के पर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. युरोप आणि यूएसमधील मऊ मागणीमुळे चौथ्या तिमाहीतील वितरण खंडांमध्ये एकूण 7.5 टक्के ची घट झाली. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.