UPI ID facilities sakal
Personal Finance

‘यूपीआय आयसीडी’ सुविधा

भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘यूपीआय’ इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट (आयसीडी) ही अभिनव सुविधा कार्यान्वित केली आहे.

सुधाकर कुलकर्णी

भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘यूपीआय’ इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट (आयसीडी) ही अभिनव सुविधा कार्यान्वित केली आहे. या सुविधेमुळे आपल्याला आपल्या बँक खात्यात रोख रक्कम भरण्यासाठी बँकेत जाऊन कॅशियरसमोर रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

ही सुविधा ज्या ‘एटीएम’मध्ये रोख जमा करणे आणि काढणे अशा दोन्ही सुविधा अर्थात कॅश रिसायकलिंग सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ही सेवा वापरता येईल. बहुतेक बँका कॅश रिसायकलिंग सुविधा ‘एटीएम’वर देत आहेत. लवकरच सर्व बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.

सुविधा वापरण्याची प्रक्रिया

1) कॅश रिसायकलिंग सुविधा असणाऱ्या ‘एटीएम’वर जाऊन, कॅश डिपॉझिट पर्याय निवडा.

2) तुमचा ‘यूपीआय’शी संलग्न (लिंक) असलेला मोबाईल नंबर टाका.

3) ज्या खात्यात रक्कम भरायची आहे, तो खाते नंबर व ‘आयएफएससी’ कोड टाका.

4) बँक खाते क्रमांक व ‘आयएफएससी’ कोड टाकल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला एक ‘क्यूआर कोड’ दिसेल, तो मोबाईलमधील ‘यूपीआय’ अॅप उघडून स्कॅन करा.

5) ‘एटीएम’च्या कॅश डिपॉझिट स्लॉटमध्ये जी रोख रक्कम भरायची आहे ती ठेवा व ॲप्रूव्ह बटणावर क्लिक करा आणि आपला ‘यूपीआय’ पिन टाका.

6) आपण निवडलेल्या खात्यात रक्कम जमा झाल्याचा ‘एसएमएस’ आपल्या मोबाईलवर येईल व त्याचबरोबर मशीनमधूनही आपण भरलेल्या रकमेची तपशिलासह पावती येईल.

याशिवाय काही ‘एटीएम’च्या बाजूला एक वेगळे कॅश डिपॉझिट मशीन असते. या मशीनवरदेखील वरीलप्रमाणे ‘यूपीआय’ अॅप वापरून रोख रक्कम आपल्याला हव्या असलेल्या खात्यात भरता येते.

थोडक्यात, या सुविधेमुळे बँक खात्यात भरावयाची रोख रक्कम कधीही आपल्या सोयीनुसार अगदी सुट्टीच्या दिवशीदेखील बँकेत न जाता भरता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT