UPI Payment Services: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 12 फेब्रुवारी रोजी श्रीलंका आणि मॉरिशससाठी UPI सेवा सुरू केली आहे. यामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमधील लोकही UPI द्वारे पेमेंट करू शकतील. हा कार्यक्रम आज दुपारी 1 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला.
यामध्ये पीएम मोदींसोबत श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासह तिन्ही देशांचे सेंट्रल बँकेचे गव्हर्नरही उपस्थित होते. RBI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. (UPI Payment Services Launched In Sri Lanka, Mauritius; PM Modi Attends Virtual Ceremony)
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या लॉन्चनंतर श्रीलंका आणि मॉरिशसमध्येही UPI सेवा सुरू होईल. मॉरिशसचे लोक भारतातही UPI पेमेंट करू शकतील. त्याचबरोबर दोन्ही देशांना भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांनाही त्याचा फायदा होणार आहे. (UPITransaction Digital Payment In Sri Lanka And Rupay Card In Mauritius Pm Modi)
रुपे कार्ड सेवा मॉरिशसमध्येही सुरू करण्यात येणार
यूपीआय सेवेसोबतच रुपे कार्ड सेवाही मॉरिशसमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यानंतर, मॉरिशस बँका RuPay यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करू शकतील. याद्वारे, भारत आणि मॉरिशसचे लोक या कार्ड सेवांचा वापर त्यांच्या स्वतःच्या देशात करू शकतील.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर आहे. PM मोदी UPI सेवा सहयोगी देशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या लॉन्चमुळे, दोन्ही बाजूंच्या लोकांना क्रॉस बॉर्डर डिजिटल व्यवहाराची सुविधा मिळू शकेल आणि या देशांशी भारताची डिजिटल कनेक्टिव्हिटी देखील वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.