UPI transaction value hits new high at rs 17.4 lakh crore in November 2023  Sakal
Personal Finance

UPI Transactions: UPI पेमेंटचा नवीन रेकॉर्ड! नोव्हेंबरमध्ये झाले 17.40 लाख कोटी रुपयांचे व्यवहार

UPI Transactions: FASTag व्यवहारांमध्येही झाली वाढ

राहुल शेळके

UPI Transactions: युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारांनी नोव्हेंबरमध्ये नवीन उच्चांक गाठला, व्यवहार 17.4 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हा आकडा ऑक्टोबरमधील 17.16 ट्रिलियन रुपयांपेक्षा 1.4 टक्के अधिक आहे. हा व्यवहार 1.5 टक्क्यांनी घसरून 11.24 अब्ज झाला आहे, तर ऑक्टोबरमध्ये तो 11.41 अब्जच्या विक्रमी उच्चांकावर होता. नोव्हेंबर महिन्यात सणासुदीच्या हंगामामुळे UPI व्यवहारांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

सप्टेंबरमध्ये व्यवहारांची संख्या 10.56 अब्ज होती, ज्यांचे मूल्य 15.8 ट्रिलियन रुपये होते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने शेअर केलेल्या डेटानुसार, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ते 54 टक्क्यांनी जास्त आणि मूल्यात 46 टक्क्यांनी जास्त होते.

FASTag व्यवहारांमध्ये किरकोळ वाढ

ऑक्टोबरमधील 320 दशलक्षच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये FASTag व्यवहार किरकोळ वाढून 321 दशलक्ष झाले. नोव्हेंबरमध्ये FASTag व्यवहारांचे मूल्य 5,303 कोटी रुपये होते, जे ऑक्टोबरमधील 5,539 कोटी रुपयांच्या तुलनेत 4 टक्क्यांनी कमी आहे.

ऑक्टोबरमध्ये देशभरात 1000 कोटींहून अधिक UPI व्यवहारांची नोंद झाली. ऑक्टोबरनंतरचा नोव्हेंबर हा सलग चौथा महिना आहे ज्यात UPI व्यवहारांची संख्या 1000 कोटींच्या पुढे गेली आहे.

आजकाल लोक रोख व्यवहारांऐवजी डिजिटल पेमेंट करण्याला प्राधान्य देत आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये सणासुदीच्या हंगामामुळे UPI व्यवहारांमध्ये आणखी वाढ झाली. NPCI डेटानुसार, IMPS द्वारे ऑक्टोबरमध्ये 49.3 कोटी व्यवहारांद्वारे 5.38 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

आर्थिक वर्ष 2027 पर्यंत UPI व्यवहारांची संख्या दररोज 100 कोटींचा आकडा पार करेल तसेच पाच वर्षांत दुकानातील 90 टक्के व्यवहार UPI द्वारे होतील अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांनी व्यक्त केली 'ही' भीती, म्हणाले- राज्यातील कायदा सुव्यवस्थाच...

Nashik Traffic Route: मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे नियोजन

Google Crome Sell : क्रोम ब्राऊजर विकून टाका! US मधून गुगलच्या मालकांना आला फोन, नेमकं प्रकरण काय?

Eye Care Tips : दुषित हवेचा डोळ्यांवर होतोय थेट परिणाम, डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुक प्रचार, उमेदवारांच्या दुचाकी फेरीमुळे मार्ग खोळंबले

SCROLL FOR NEXT