Nobel Prize In Economics Sakal
Personal Finance

Nobel Prize In Economics: क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचे नोबेल, श्रमिक महिलांसाठी केले मोठे काम

Nobel Prize In Economics 2023: क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचे नोबेल, महिला श्रमिक क्षेत्रात मोठे काम केले

राहुल शेळके

Nobel Prize In Economics 2023: 2023 चा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक क्लॉडिया गोल्डिन यांना देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने त्यांची निवड केली आहे. गोल्डिन यांनी महिला श्रमिक बाजार क्षेत्रात काम केले आहे. क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. 1989 ते 2017 या काळात त्या National Bureau of Economic Research (NBER) च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या.

(Claudia Goldin wins Nobel Prize in Economics for work on women’s labour market outcomes)

आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळख

एक आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून, गोल्डिन यांच्या संशोधनामध्ये महिला कामगार, उत्पन्नातील लिंग अंतर, उत्पन्नातील असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि स्थलांतर यासह विविध विषयांचा समावेश आहे.

त्यांचे बरेचसे संशोधन भूतकाळाच्या दृष्टीकोनातून वर्तमानाचा अर्थ लावणे आणि वर्तमानातील समस्यांचे मूळ शोधणे हे आहे. त्यांचे सर्वात अलीकडील पुस्तक म्हणजे करिअर अँड फॅमिली: अ सेंच्युरी ऑफ वुमन—द लाँग जर्नी टूवर्ड इक्विटी (प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस, 2021).

(Claudia Goldin wins 2023 Nobel economics prize)

अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांवरील महत्त्वपूर्ण कामासाठी गोल्डिन ओळखल्या जातात. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका क्लॉडिया गोल्डिन यांना श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी आज अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

नोबेल समितीने म्हटले- गोल्डिन यांच्या संशोधनातून अर्थव्यवस्थेतील लैंगिक अंतराबाबत माहिती मिळते. नोबेल समितीने पारितोषिकाच्या घोषणेदरम्यान सांगितले की, गोल्डिन यांच्या संशोधनाने महिलांचे उत्पन्न आणि श्रमिक बाजारातील परिणाम यांचा सर्वसमावेशक लेखाजोखा उपलब्ध करून दिला आहे.

(Who is Claudia Goldin, Who is The Winner Nobel Prize Of Economics Year 2023)

बक्षीस म्हणून नऊ लाख सात हजार डॉलर्स मिळणार

अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा अर्थशास्त्रातील पुरस्कार विजेत्याला 10 दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजे सुमारे नऊ लाख सात हजार डॉलर्स दिले जातात.

गेल्या वर्षीचा पुरस्कार यूएसस्थित अर्थशास्त्रज्ञ बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डिबिगोंना यांना आर्थिक मंदीच्या काळात बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी या तिघांनी संशोधन केले आणि आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी चांगले पर्याय सूचवले होते. त्यांच्या बँक आणि आर्थिक संकटांवरील कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT