Adani Group: वडराज सिमेंट खरेदी करण्यासाठी अदानी ग्रुपसह अनेक कंपन्या शर्यतीत आहेत. अहवालानुसार, अदानी समूहाच्या कंपनीसह, सज्जन जिंदालची कंपनी जेएसडब्ल्यू सिमेंट, आर्सेलर मित्तल समूह वदराज सिमेंटच्या खरेदीसाठी इच्छुक आहेत. दिवाळखोरीच्या प्रक्रियेअंतर्गत कंपनीची विक्री केली जाईल.
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
2018 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने Beumer Technology India ची थकबाकी भरण्यासाठी वडराज सिमेंट बंद करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, कंपनीची मालमत्ता विकण्याच्या प्रक्रियेमुळे न्यायालय खूपच निराश झाले होते. असे वृत्त The Economic Times ने दिले आहे.
बँकेच्या याचिकेवर 4 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने हा मुद्दा एनसीएलटीकडे वर्ग केला होता. कंपनीच्या कर्जदात्याने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी पुलकित गुप्ता यांना व्यावसायिक म्हणून नियुक्त करण्याची सूचना केली होती. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
कोणत्या बँकांकडून कर्ज घेतले आहे?
वडराज सिमेंटवर एकूण 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीच्या कर्जदारांमध्ये पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, यूको बँक आणि येस बँक यांचा समावेश आहे.
अल्ट्राटेक सिमेंटनंतर अदानी समूह हा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक आहे. त्याची सिमेंट उत्पादनाची क्षमता 65 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे. त्याचे संपूर्ण भारतात डझनहून अधिक उत्पादन कारखाने आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.