Veg Thali Price Sakal
Personal Finance

Veg Thali Price: सर्वसामान्यांना झटका! श्रावणाच्या तोंडावर शाकाहारी थाळी 11 टक्क्यांनी महागली; काय आहे कारण?

राहुल शेळके

Veg, Non-Veg Thali Price: यंदा जुलैमध्ये अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या. जुलैमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किमती वाढल्या आहेत. शाकाहारी थाळीमध्ये रोटी, भात, डाळ, दही, सलाड सोबत कांदा, बटाटा, टोमॅटो यांचा समावेश होतो. मांसाहारी थाळीमध्ये शाकाहारी थाळीसारखेच अनेक पदार्थ असतात पण मसूर ऐवजी चिकन (ब्रॉयलर) आहे.

जुलैमध्ये शाकाहारी थाळी किती महाग झाली?

'रोटी राइस रेट' नावाची रेटिंग एजन्सी क्रिसिलने जारी केलेल्या अहवालानुसार, या वर्षी जूनमध्ये शाकाहारी थाळीची किंमत 29.4 रुपये होती. ती वाढून जुलैमध्ये 32.6 रुपये झाली. अशाप्रकारे, जूनच्या तुलनेत जुलैमध्ये शाकाहारी थाळी सुमारे 11 टक्क्यांनी महाग झाली आहे.

टोमॅटोच्या किमती वार्षिक आधारावर 40 टक्क्यांनी कमी झाल्यामुळे जुलैमध्ये शाकाहारी थाळी वार्षिक आधारावर 4 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. वार्षिक आधारावर कांदा 65 टक्के आणि बटाटा 55 टक्क्यांनी महागल्याने शाकाहारी थाळीचे भाव आणखी घसरण्याचे थांबले.

शाकाहारी थाळी महाग होण्यामागचे कारण काय?

क्रिसिलच्या या अहवालानुसार, शाकाहारी थाळी महाग होण्याचे मुख्य कारण म्हणजे टोमॅटोच्या किमतीत झालेली वाढ. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये टोमॅटोचे भाव 55 टक्क्यांनी वाढून 66 रुपये किलो झाले. याशिवाय जुलैमध्ये बटाटा आणि कांद्याच्या दरात अनुक्रमे 20 आणि 16 टक्क्यांनी वाढ झाल्याने शाकाहारी थाळीही महाग झाली आहे.

मांसाहारी थाळी किती महाग आहे?

शाकाहाराबरोबरच आता मांसाहारी थाळीचे भावही वाढू लागले आहेत. पूर्वी या थाळीचे भाव कमी होत होते. क्रिसिलच्या या अहवालानुसार, या वर्षी जूनमध्ये मांसाहारी थाळीची किंमत 58 रुपये होती, जी जुलैमध्ये 6 टक्क्यांनी वाढून 61.4 रुपये झाली आहे. याचे कारण टोमॅटो महाग आहेत.

शाकाहारी थाळीच्या तुलनेत मांसाहारी थाळीची किंमत कमी असण्याचे कारण म्हणजे या थाळीमध्ये 50 टक्के वाटा असलेल्या ब्रॉयलरच्या किमती स्थिर आहेत. मांसाहारी थाळी मासिक आधारावर महाग झाली असेल, परंतु वार्षिक आधारावर त्याची किंमत कमी झाली आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये या थाळीची किंमत 67.8 रुपये होती, जी या जुलैमध्ये 61.4 रुपयांवर आली आहे. मांसाहारी थाळी वार्षिक आधारावर स्वस्त होण्याचे कारण म्हणजे ब्रॉयलरच्या किमतीत 11 टक्के घसरण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये चरबी कोण मिसळत होतं? अमित शाहांना लिहिलं पत्र

EY Pune: 'इतके मेलेले लोक, फक्त अंतिम संस्कार...', CAच्या मृत्यूनंतर अश्नीर ग्रोव्हरचा व्हिडिओ व्हायरल

NZ vs SL, Test : बॉल आला अन् कॅप्टन साऊदीने झपकन एकाच हाताने पकडला अफलातून कॅच, पाहा Video

Accident: चूक कोणाची? वेगाने Bike पळवणाऱ्या तरुणाची, की त्या SUV चालकाची.... थरार Video Viral

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

SCROLL FOR NEXT