Vehicle Sales Sakal
Personal Finance

Vehicle Sales: सवलत आणि भेटवस्तूंच्या माध्यमातून वाहन कंपन्यांची विक्री; कोणत्या वाहनावर किती सूट मिळतेय?

Vehicle Sales: उन्हाळ्यात ग्राहक घराबाहेर पडायला तयार नव्हते. त्याचा परिणाम कार बाजारावर दिसून आला. शोरूम रिकामे पडले आहेत आणि कंपन्यांची विक्री कमी होत आहे. त्यातच, मान्सूनचे आगमन झाले असताना, लोकांनी वाहन खरेदीचा निर्णय पुढे ढकलला.

राहुल शेळके

Vehicle Sales: उन्हाळ्यात ग्राहक घराबाहेर पडायला तयार नव्हते. त्याचा परिणाम कार बाजारावर दिसून आला. शोरूम रिकामे पडले आहेत आणि कंपन्यांची विक्री कमी होत आहे. त्यातच, मान्सूनचे आगमन झाले असताना, लोकांनी वाहन खरेदीचा निर्णय पुढे ढकलला. हे पाहून कार कंपन्या आणि डीलर्स विक्री वाढवण्याच्या तयारीत आहेत. रात्री उशिरापर्यंत कारचे शोरूम सुरू असून परवडणाऱ्या कारवरही मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या FADA ने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, प्रचंड उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे शोरूममध्ये ग्राहकांचा ओघ 18 टक्क्यांनी कमी झाला आहे. आता देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट संपली असली तरी मारुती सुझुकीसारख्या कंपन्या रात्री उशिरापर्यंत शोरूम सुरू ठेवण्याच्या तयारीत आहेत.

पावसाळा सुरू झाल्याने, कार कंपन्या आणि डीलर्स खरेदीदारांना सवलत, एक्सचेंज बोनस आणि भेटवस्तू देत आहेत. पावसाळ्यात वाहनांची खरेदी कमी असल्याने, कंपन्या विक्री वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या ऑफर्स देतात.

मारुती अल्टो K10 वर 40,000 रुपये, S-Presso आणि Wagon R वर 25,000 ते 30,000 रुपये आणि Swift वर 15,000 ते 20,000 रुपये सूट दिली जात आहे. बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या माहितीत मारुती सुझुकी इंडियाचे अधिकारी पार्थ बॅनर्जी म्हणाले, कोणत्याही ग्राहकाला दुपारी शोरूममध्ये यायचे नाही. विक्री वाढवण्यासाठी आम्ही संध्याकाळसाठी विशेष व्यवस्था करत आहोत. रात्री उशिरापर्यंत शोरूम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चांगल्या पावसामुळे खरीप पिकाचे उत्पादन चांगले येईल, त्यामुळे विक्रीही लवकरच वाढेल.

होंडाने ‘होंडा मॅजिकल मान्सून’ नावाची मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत, कंपनी Amaz, City, Elevate आणि City e:HEV सह सर्व कारवर भेटवस्तू देत आहे. जुलैमध्ये कारची डिलिव्हरी घेणाऱ्या ग्राहकांना स्वित्झर्लंडची सहल किंवा 75,000 रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी असेल. टेस्ट ड्राइव्ह घेतल्यावर कंपनी सरप्राईज गिफ्टही देत ​​आहे. ही ऑफर 31 जुलैपर्यंत असणार आहे.

होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष (मार्केटिंग आणि सेल्स) कुणाल बहल म्हणाले, तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल किंवा प्रथमच कार खरेदी करणार असाल तर Honda तुमच्यासाठी वाट पाहत आहे. ही मर्यादित कालावधीची ऑफर देशभरातील Honda अधिकृत शोरूममध्ये उपलब्ध आहे.

Tata Tiago, Altroz, Nexon, Punch, Harrier, Safari तसेच Hyundai Grand i10 Nios, Aura, Exeter आणि Alcazar वर Rs 15,000 ते Rs 65,000 पर्यंतच्या सवलती उपलब्ध आहेत.

एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले, पावसाळ्याच्या काळात फारसे सण नसतात आणि हवामानाच्या अनिश्चिततेमुळे वाहनांच्या खरेदीवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच विक्रीवर परिणाम होऊ नये म्हणून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत जुलैमध्ये वाहनांवर अधिक सूट देण्यात येत आहे.

सिंघानिया म्हणाले की, काही मॉडेल्स वगळता बहुतांश मॉडेल्सचा स्टॉक डीलर्सकडे आहे. अजूनही SUV ला मागणी आहे, त्यामुळे त्यांच्यावर कमी सवलत दिली जात आहे. इतर वाहनांवर जास्त सूट दिली जात आहे. सणासुदीपर्यंत ही सवलत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

न विकल्या गेलेल्या वाहनांबद्दल बोलताना सिंघानिया म्हणाले की, मे महिन्यात डीलर्सकडे इतकी वाहने होती की त्यांची विक्री करण्यासाठी 55 ते 60 दिवस लागले असते. या सवलतीमुळे आशा आहे की स्टॉक फक्त 30 दिवसांपर्यंत कमी होईल.

मारुती बलेनोच्या मॅन्युअल पेट्रोल मॉडेलवर 35,000 रुपये आणि ऑटोमॅटिक पेट्रोलवर 40,000 रुपये रोख सूट दिली जात आहे. त्याचप्रमाणे XL6 च्या पेट्रोल मॉडेलवर 20,000 रुपये आणि CNG मॉडेलवर 15,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. पेट्रोल मॉडेल्सवर 20,000 रुपये आणि CNG वर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा त्यांच्या विविध कारवर सवलत देत आहे. XUV400 इलेक्ट्रिक SUV वर 4 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे, ज्यामध्ये 3.80 लाख रुपयांची रोख सूट आणि ॲक्सेसरीजवर 20,000 रुपयांची सूट दिली जात आहे. Scorpio-N वर 60,000 ते रु. 1 लाख पर्यंत सूट उपलब्ध आहे. XUV700 X5 वर 1.30 ते 1.50 लाख रुपये आणि X7 वर 1.50 लाख रुपयांची सूट आहे. बोलेरोवर 69,000 रुपयांपर्यंत सूट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT