Vijayadashami 2023 financial lessons to learn from Dussehra  Sakal
Personal Finance

Vijayadashami 2023: विजयादशमी आर्थिक गुंतवणुकीचे धडे देणारा सण

Vijayadashami 2023: आर्थिक व्यवहारात प्रभू रामाची शिस्त अंगीकारली पाहिजे.

राहुल शेळके

Vijayadashami 2023: दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. दसऱ्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला आणि तेव्हापासून हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया आजच्या आर्थिक जगात दसऱ्याचा गुंतवणुकीशी कसा मेळ आहे ते!

आर्थिक विकासात येणारे अडथळे दूर करा

रावणाचा वध करून रामाने विजय मिळवला. भगवान रामाला चांगुलपणाचे प्रतीक मानले जाते आणि रावणाला वाईटाचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांनी वाईट गोष्टींचा नायनाट करून लोकांना जीवनाचा नवा मार्ग दाखवला.

श्रीमंत होण्यासाठी वाईट गोष्टींवर मात करावी लागते. कर्ज, क्रेडिट कार्ड, शेअर बाजारातील तोटा असे अनेक अडथळे आर्थिक विकासात येतात जे लोकांना श्रीमंत होण्यापासून थांबवतात. अशा परिस्थितीत, श्रीमंत होण्यासाठी, तुम्हाला या अडथळ्यांना हुशारीने सामोरे जावे लागेल.

आर्थिक व्यवहारात प्रभू रामाची शिस्त अंगीकारा

भगवान राम हे अतिशय शिस्तप्रिय मानले जातात. अशा परिस्थितीत लोकांनी आर्थिक व्यवहारातही प्रभू रामाची शिस्त अंगीकारली पाहिजे. शिस्तबद्ध गुंतवणूक करावी जेणेकरून चांगला परतावा मिळू शकेल.

गुंतवणूक करताना संयम ठेवा

रावणाने माता सीतेचे अपहरण केले. यानंतर भगवान रामाने धीर धरला आणि हुशारीने लंका जिंकली. आजच्या काळात गुंतवणूकदारांमध्ये संयमाचा अभाव आहे.

चांगला परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांना संयम बाळगावा लागेल. दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्यास वेळ लागतो आणि वेळोवेळी धीर धरावा लागतो.

आर्थिक संरक्षण गरजेचे

दसरा जगात मानवतेचे रक्षण करण्याची शिकवण देतो. अशा स्थितीत आपले आर्थिक संरक्षण केले पाहिजे. लोक त्यांच्या आर्थिक संरक्षणाद्वारेच त्यांची संपत्ती वाढवू शकतात.

यासोबतच लोकांनी आपत्कालीन निधी देखील ठेवला पाहिजे जेणेकरून तो निधी वाईट काळात वापरता येईल आणि कर्ज घेणे टाळता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT