Vikram Avasarikar writes investment risk management share market sakal
Personal Finance

तोट्याची जोखीम करा कमी

बाजारात कोणत्याही गोष्टीची खात्री देता येत नाही

सकाळ वृत्तसेवा

- विक्रम अवसरीकर

मागच्या भागात आपण बघितले, की आपण कोणत्या तऱ्हेने अतिशय सोप्या पद्धतीने आपली जोखीम किती असावी याचा विचार करू शकतो. बाजारात कोणत्याही गोष्टीची खात्री देता येत नाही. एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे, की हा सगळा खेळ शक्यतांचा होता, आहे आणि असेल.

आपण आपल्याला फायदा व्हायची शक्यता कशी वाढवतो, यावर आपल्याला किती फायदा होईल हे अवलंबून असते. फायद्याची शक्यता वाढवायची असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तोटा होण्याची शक्यता कशी कमी करता येईल याचा अभ्यास केला पाहिजे.

प्रत्येकाची जोखीम घ्यायची व्याख्यादेखील वेगळी आहे. मात्र फायदा प्रत्येकालाच पाहिजे असतो, त्यामुळे ही शक्यता वाढवण्यासाठी परत आपल्याला तोटा कसा कमीत कमी ठेवायचा इकडेच यावे लागेल. तोटा कमी झाला, पैसे वाचले, की उरेल फायदा.

हे सगळे साध्य करण्यासाठी आपली गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी कशी विखरून ठेवता येईल, याचा विचार करावा लागेल. त्याला पर्याय नाही. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना खालील काळजी घेणे आवश्यक आहे.

गुंतवणूक करताना...

आपली गुंतवणूक एकाच प्रकारच्या फंडामध्ये करू नये. त्यांचा पोर्टफोलिओ सारखाच असण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवासुद्धा सारखाच मिळेल. आपली गुंतवणूक विखरून म्हणजे वेगवेगळ्या पर्यायांमध्ये करावी.

एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नये. एखादा लार्ज कॅप किंवा इंडेक्स फंड, एखादा मिड कॅप, एखादा बॅलन्स फंड, एखादा स्मॉल कॅप फंड निवडून त्यात गुंतवणूक केली, तर संपूर्ण शेअर बाजारामध्ये आपली गुंतवणूक होते. त्यामुळे एखाद्या सेक्टरचा तोटा दुसरीकडे होणार नाही.

वेगवेगळ्या फंड कंपन्यांच्या योजना निवडाव्यात. प्रत्येक फंड कंपनीची गुंतवणूक करण्याची पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे आपल्या गुंतवणुकीतील विविधता वाढते. एखादी पद्धत त्या काळात चुकीची ठरली, तरी दुसरीकडे त्याची भरपाई होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तोटा कमी होईल.

शेअर बाजार एकदम खाली गेला असेल, तरच एकरकमी गुंतवणूक करावी;अन्यथा रक्कम विभागून गुंतवणूक करावी. त्यामुळे बाजार वरती असताना गुंतवणूक होईल; तसेच बाजार खाली असतानासुद्धा. त्यामुळे सरासरी वाढून तोटा व्हायची शक्यता कमी होईल.

शक्यतो मासिक गुंतवणूक वेगवेगळ्या वेळी करावी. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारात गुंतवणूक होईल. शेअर बाजारातसुद्धा आपण वेगवेगळ्या कंपन्या निवडल्या पाहिजेत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, चक्रीय फायदा देणाऱ्या, काही मोठ्या,

काही छोट्या कंपन्या निवडाव्यात. त्यामुळे आपण तोटा कमी करण्याची शक्यता निर्माण करत असतो. फक्त शेअर किंवा म्युच्युअल फंडांवरती अवलंबून न रहाता कंपनी डिपॉझिट, सोने, आरबीआय बॉंड अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केल्यास तोटा कमी होण्याची शक्यता वाढते.

सगळीकडे, कुठलीही खात्री नसताना; सर्व प्रकारे विखरून केलेली गुंतवणूकच आपल्याला तारून नेईल. गुंतवणूक करताना तोटा कमीत कमी झाला पाहिजे; त्यामुळे फायदा व्हायची शक्यता वाढते, हे लक्षात ठेवले म्हणजे सोपे होईल.

(लेखक फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT