Volkswagen Sakal
Personal Finance

Volkswagen: फॉक्सवॅगन कंपनीला भारतात पार्टनरची गरज का? काय आहे कंपनीचा पुढचा प्लॅन?

राहुल शेळके

Volkswagen To Sell Stake: आणखी एक विदेशी ऑटो कंपनी भारतातील हिस्सा स्थानिक भागीदाराला विकण्यासाठी बोलणी करत आहे. जर्मनीची आघाडीची ऑटो कंपनी फोक्सवॅगन आपल्या भारतीय व्यवसायातील हिस्सा स्थानिक कंपनीला विकण्यासाठी बोलणी करत आहे.

भारतात दोन अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करूनही फोक्सवॅगनला बाजारपेठेत स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. कंपनीच्या कार्यकारिणीने सांगितले की, बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी कंपनी नवीन परवडणाऱ्या कार विकसित करत आहे. कंपनीने आतापर्यंत महागडी युरोपियन वाहने देशात लाँच केली आहेत ज्यांना फारसे यश मिळालेले नाही.

देशातील हायब्रीड वाहनांवरील कराचे दर कमी करावेत, अशी मागणीही समूहाने केली आहे. कंपनीने असा युक्तिवाद केला आहे की, ज्या वेळी बाजारपेठेला पेट्रोल-डिझेल इंजिनपासून ग्रीन कारमध्ये बदलायला वेळ लागत आहे अशा वेळी सरकार लोकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही.

स्कोडा ऑटोचे ग्लोबल सीईओ क्लॉस गेल्मर यांनी ही माहिती दिली आहे. ते भारतातील फोक्सवॅगन समूहासाठी गुंतवणूक आणि धोरणाचे प्रमुख देखील आहेत. असे मानले जाते की कंपनी महिंद्रा अँड महिंद्राला भारतातील भागीदार बनवू शकते.

गेल्मरने मात्र फोक्सवॅगन समूह स्थानिक भागीदाराशी कधी बोलणी पूर्ण करेल हे सांगितले नाही. क्लॉस गेल्मर म्हणाले की, युरोपियन गाड्या बहुतेक वेळा जास्त तांत्रिक असतात, ज्याची भारतात गरज नसते. अनेकदा आपण आपल्या अपेक्षेनुसार कार बनवतो ज्याची किंमत जास्त असते. हा एक पैलू आहे जो स्पर्धात्मक स्थिती कमी करतो. म्हणून, आपल्याला शिकण्याची गरज आहे आणि आपल्याला योग्य माहिती असली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Track मेन्टेनन्स मशीनची समोरासमोर धडक; 5 कर्मचारी जखमी, देखभालीचं काम सुरू असताना घटना

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - हे स्पर्धक ठरले 'बिग बॉस मराठी ५' चे टॉप ३? सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल

Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

Latest Maharashtra News Updates: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अकोले विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT