Walmart to lay off hundreds of corporate staff, relocate others report  Sakal
Personal Finance

Walmart Layoffs: वॉलमार्टमध्ये पुन्हा मोठी कर्मचारी कपात; शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Walmart Layoffs: जगातील सर्वात मोठी रिटेलर असलेल्या वॉलमार्टने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आहे. कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये कपात करण्याव्यतिरिक्त, वॉलमार्टने काही कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत येण्याचे निर्देश दिले आहेत

राहुल शेळके

Walmart Layoffs: जगातील सर्वात मोठी रिटेलर असलेल्या वॉलमार्टने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आखली आहे. कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये कपात करण्याव्यतिरिक्त, वॉलमार्टने काही कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत येण्याचे निर्देश दिले आहेत, असे सूत्राने ब्लूमबर्गला सांगितले. डॅलस, अटलांटा आणि टोरंटो येथील लहान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कंपनीचे बेंटोनविले, आर्कान्सा आणि सॅन फ्रान्सिस्को बे एरिया येथील कॉर्पोरेट मुख्यालयासह मोठ्या केंद्रांवर जाण्यास सांगितले आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तीने सांगितले की, कर्मचाऱ्यांना अजूनही अर्धवेळ नोकरी करण्याची परवानगी असेल, परंतु यासाठी त्यांना अधिकाधिक वेळ ऑफिसमध्ये घालवावा लागेल. याबाबत वॉलमार्टच्या प्रवक्त्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, कंपनीकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नाही.

वॉलमार्टमध्ये 21 लाख लोक काम करतात

जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये येण्यास सांगत आहेत. वॉलमार्ट ही जगातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता आहे. वॉलमार्ट देशांतर्गत अंदाजे 4,600 स्टोअर्स चालवते.

नियामक फाइलिंगनुसार, वॉलमार्टने 31 जानेवारी 2024 पर्यंत 21 लाख लोकांना रोजगार दिला. वॉलमार्टने गेल्या वर्षीपासून कर्मचारी कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. कंपनीचे उद्दिष्ट आहे की आर्थिक वर्ष 2026 च्या अखेरीस तिचे 65% स्टोअर ऑटोमेशनवर काम करतील.

फेब्रुवारी 2023 मध्येही, वॉलमार्टने अमेरिकेतील तीन तंत्रज्ञान केंद्रे बंद केली होती आणि आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना सांगितले होते की जर त्यांना त्यांच्या नोकऱ्या हव्या असतील तर त्यांना स्वतःला पुन्हा ऑफिसमध्ये परत यावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT