Warren Buffet's Berkshire exits Paytm at rs 620 crore loss, sells 2.5 percent stake  Sakal
Personal Finance

Paytm: जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना 620 कोटींचा फटका! पेटीएममधील संपूर्ण हिस्सा विकला

Paytm: पेटीएमचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत

राहुल शेळके

Paytm: जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवे पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडमधून पूर्णपणे बाहेर पडली आहे. बर्कशायर हॅथवेने वन 97 कम्युनिकेशन्समधील आपला संपूर्ण 2.5 टक्के हिस्सा विकला आहे.

बर्कशायरला या करारातून 1,371 कोटी रुपये मिळाले आहेत. बर्कशायर हॅथवेने 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये पेटीएममध्ये 2200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. बर्कशायरला सुमारे 620 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार बर्कशायरने कंपनीचे 17,027,130 शेअर्स विकत घेतले होते आणि संपादनाची सरासरी किंमत प्रति शेअर 1,279.70 रुपये होती.

यानंतर बर्कशायरने 2021 मध्ये वन 97 कम्युनिकेशन्सच्या IPO मधील काही भाग विकला. आता बर्कशायर हॅथवेने पेटीएममधील 15,623,529 शेअर्सची 877.2 रुपये प्रति शेअर या दराने विक्री केली आहे.

बायबॅकनंतर शेअर्सची संख्या वाढली

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात One97 कम्युनिकेशन्सने शेअर बायबॅक प्रोग्राम लाँच केला होता. या कार्यक्रमात कंपनीने 1.55 कोटी पेक्षा जास्त शेअर्स सरासरी 546 रुपये या दराने विकत घेतले होते. सुमारे 850 कोटी रुपयांचा हा बायबॅक प्रोग्राम होता.

या बायबॅकनंतर पेटीएमच्या मूळ कंपनीचे शेअर्स 68% नी वाढले आणि 20 ऑक्टोबर रोजी ते 21 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते.

गुंतवणूकदार तोट्यात

शुक्रवारी पेटीएमचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर 3.23% च्या घसरणीसह 893 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा IPO 2021 साली आला होता. या IPO ची इश्यू किंमत 2150 रुपये होती.

लिस्टिंग झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स इश्यू किंमतीच्या जवळपासही जाऊ शकले नाहीत. याचा अर्थ बर्कशायरचे मालक बफेट यांनाच नाही तर गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT