Union Budget  
Personal Finance

Union Budget: जाणून घ्या, अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? अन् तयारी कोण करते?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज सकाळी 2024-2025 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

सकाळ डिजिटल टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज सकाळी 2024-2025 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस पडला. कही खुशी कहीं गम असा यंदाचा अर्थसंकल्प होता तर आज आपणा जाणून घेऊयात देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? तयारी कोण करते आणि प्रक्रिया कधी सुरू होते? (What Is Union Budget How And Who Prepares Union Budget know all information)

मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. बजेट तयार करण्याची प्रक्रिया खूप आधीच सुरू होते. नोकरदार लोक असोत की गृहिणी, व्यापारी असोत की मोठे उद्योगपती, प्रत्येकजण बजेटची वाट पाहत असतो.

सरकारकडून मिळणाऱ्या सवलतींवर लोक लक्ष ठेवून असतात. रेल्वे आणि आयकर स्लॅबमधील बदलांची सर्वसामान्य माणूस आतुरतेने वाट पाहत असतो. त्याचबरोबर व्यापारी आणि उद्योजकही करमाफीची प्रतीक्षा करतात.

बजेट म्हणजे काय?

सर्वात आधी बजेट म्हणजे काय? हे समजुन घेणं गरजेचं आहे. बजेट हा शब्द फ्रेंच शब्द Bougette पासून आला आहे असे म्हणतात. म्हणजे चामड्याची पिशवी. असे म्हणतात की, प्राचीन काळी लोक आपली कमाई आणि महत्त्वाची कागदपत्रे चामड्याच्या पिशव्यांमध्ये ठेवत असत.

सोप्या भाषेत समजले तर बजेट म्हणजे एका वर्षाचा लेखाजोखा. यामध्ये सरकारच्या कमाईचा अंदाज लावला जातो. सरकारला करातून किती पैसा मिळणार आणि तो कुठे खर्च होणार? ‘वार्षिक आर्थिक विवरण’ ची चर्चा राज्यघटनेच्या ‘अनुच्छेद ११२’ मध्ये केली आहे. बजेट हे एक प्रकारचे मनी बिल आहे. अर्थसंकल्प पहिल्यांदा लोकसभेत सादर केला जातो. त्यानंतर ते राज्यसभेत मांडले जाते.

तर अर्थसंकल्पाची तयारी कोण करते?

अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागावर आहे. 2016 पूर्वी, सामान्य अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केले जात होते, परंतु आता ते एकत्र सादर केले जातात. आज अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सादर केला जातो. ते तयार करण्यात अर्थतज्ज्ञ, आर्थिक तज्ज्ञ आणि इतर अनेक तज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात.

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प कसा तयार होतो?

सर्वसाधारण अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अनेक महिने अगोदर सुरू केली जाते. ते बनवण्याची जबाबदारी वित्त सचिव, महसूल सचिव आणि सचिव खर्च यांची आहे. यासाठी अनेक बैठका घेण्यात येतात. अर्थमंत्र्यांसोबत दररोज एकतरी बैठक होत असते. याबाबत पंतप्रधानांशीही चर्चा केली आहे.

याशिवाय अर्थसंकल्प तयार करण्यासाठी विविध चेंबर्स, संस्था, संघटनांशी चर्चा करून त्यांची मते घेतली जातात. खर्च सचिव, NITI आयोगाचे सदस्य सचिव आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद देखील अर्थसंकल्प तयार करण्यात मदत करतात. या काळात संपूर्ण टीमला पंतप्रधान, अर्थमंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि आर्थिक सल्लागार समितीचे सहकार्य मिळते.

गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाते

अर्थसंकल्प बनवणे जितके मोठे आव्हान आहे, तितकेच ते गोपनीय ठेवणेही महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी असते. अर्थ मंत्रालयाचे अधिकारी बजेट तयार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. अर्थसंकल्प अंतिम झाल्यावर अधिकाऱ्यांना कुटुंबासाठीही वेळ नसतो.

त्यांना त्यांच्या कुटुंबाजवळ जाण्याची परवानगी नाही किंवा इतर लोकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. बजेटच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या मोबाईलवरही बंदी घातली जाते. अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर नॉर्थ ब्लॉकमधील सर्वात सुरक्षित भागात ठेवला जातो. इथे पक्षीसुद्धा प्रवेश करु शकत नाही.

पूर्वी सायंकाळी सादर करण्यात येत होते बजेट

2000 पर्यंत अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर होत असे. खरे तर हे ब्रिटीश काळापासून होत आले आहे. ब्रिटीश राजवटीत भारताचा अर्थसंकल्प ब्रिटनमध्ये दुपारी मंजूर होत असे. मात्र, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री यशवंत सिंह यांनी वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा मोडीत काढत अर्थसंकल्पाची वेळ सकाळी 11 वाजता केली. त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाने धाडली नोटीस; लाडकी बहीण योजनेवरुन वादग्रस्त विधान

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईत कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साहेसहा टन चांदीच्या विटा

IND vs SA: दुसऱ्या सामन्यात येणार पावसाची आडकाठी, वाचा काय आहेत हवामान अंदाज

Sholay : सचिन यांनी असं वाचवलं शोलेमधील गब्बरचं करिअर ; हा भन्नाट किस्सा जरूर वाचा

Dev Uthani Ekadashi 2024: देव उठनी एकादशीला चुकूनही करू 'या' गोष्टी, माता लक्ष्मीचा होईल नाराज

SCROLL FOR NEXT