Who is Ashok Vaswani, new Kotak Mahindra Bank CEO  Sakal
Personal Finance

Kotak Mahindra Bank: उदय कोटक यांच्यानंतर कोटक बँकेची कमान अशोक वासवानी यांच्या हाती, RBIकडून मिळाली मंजुरी

Kotak Mahindra Bank New CEO: उदय कोटक यांची जागा घेणारे अशोक वासवानी कोण आहेत?

राहुल शेळके

Kotak Mahindra Bank New CEO: उदय कोटक यांनी सप्टेंबरमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर बँकेचे पुढील एमडी आणि सीईओ कोण असेल याविषयी चर्चा चालू होती. मात्र, आता याचा खुलासा झाला आहे.

कोटक महिंद्रा बँकेने माहिती दिली की भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून अशोक वासवानी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

उदय कोटक यांनी 21 वर्षांनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक वासवानी यांची नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत अशोक वासवानी?

अशोक वासवानी हे गेल्या साडेतीन दशकांपासून करिअर बँकर म्हणून कार्यरत आहेत. वासवानी सुरुवातीला सिटीग्रुपमध्ये होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर जागतिक व्यवसाय उभारले आणि वाढवले. सिटीग्रुपसोबत काम करताना, ते सिटीग्रुप एशिया पॅसिफिकचे सीईओ आणि सिटीग्रुप ग्लोबल ऑपरेटिंग आणि मॅनेजमेंट कमिटीचे सदस्यही राहिले आहेत.

पूर्वी, वासवानी हे लंडनमधील बार्कलेज बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सध्या, वासवानी यूएस-इस्त्रायली एआय फिनटेक कंपनी पगाया टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आहेत. ते लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप आणि यूकेच्या एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटचे बोर्ड सदस्य देखील आहेत.

अशोक वासवानी यांनी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून कॉमर्स, इकॉनॉमिक्स आणि अकाउंटन्सीमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या कार्यकारी मंडळाचे सभासद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT