Wholesale Inflation: सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर (-) 0.26 टक्के होता. ऑगस्टमध्ये तो (-) 0.52 टक्के होता. सप्टेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर नीचांकी पातळीवर पोहोचण्याचे कारण म्हणजे रासायनिक उत्पादने, खनिज तेल, कापड, धातू आणि खाद्यपदार्थांच्या किंमती घसरल्या आहेत.
इंधन आणि विजेच्या बाबतीत घाऊक महागाई दर 3.35 टक्क्यांवर आला आहे, जो आधी जुलै आणि ऑगस्टमध्ये अनुक्रमे 12.73 टक्के आणि 6.03 टक्कांवर होता.
भारतातील घाऊक महागाई दर सलग सहाव्या महिन्यात घसरला आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 0.26 टक्क्यांनी घसरला आहे. सोमवारी म्हणजेच आज जाहीर झालेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाई दर -0.52 टक्क्यांवर पोहोचला होता.
महागाई का कमी होत आहे?
रॉयटर्सने सर्वेक्षण केलेल्या अर्थशास्त्रज्ञांनी सप्टेंबरसाठी घाऊक किंमत निर्देशांक 0.5 टक्के वाढण्याची अपेक्षा केली होती. वाणिज्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "सप्टेंबर 2023 मधील महागाई दर मुख्यत्वे रासायनिक उत्पादने, खनिज तेल, कापड, मूलभूत धातू आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे."
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की भाजीपाल्यांच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे भारतातील किरकोळ महागाई वाढीचा दर सप्टेंबरमध्ये 5.02 टक्के या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होता.
घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय?
घाऊक किंमत निर्देशांक हा (WPI) कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या गेलेल्या आणि व्यापार केलेल्या वस्तूंच्या किंमतीतील बदलांचे मूल्यांकन करतो. अर्थव्यवस्थांमध्ये महागाई दर मोजण्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय)चा वापर केला जातो. घाऊक किंमत निर्देशांकामध्ये फक्त वस्तूंचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये सेवांचा समावेश नसतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.