Wholesale inflation rises to 0.73 percent in December due to rise in food prices  Sakal
Personal Finance

WPI Inflation: महागाईने गाठला कळस! किरकोळ नंतर घाऊक महागाई देखील वाढली; काय आहे कारण?

WPI Inflation: सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये महागाईचा दर 0.74 टक्के होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तो 0.26 टक्के होता. महागाई दर वाढण्याचे कारण अन्नधान्याच्या किंमतीत झालेली वाढ हे आहे.

राहुल शेळके

WPI Inflation: सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये महागाईचा दर 0.74 टक्के होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तो 0.26 टक्के होता. महागाई दर वाढण्याचे कारण अन्नधान्याच्या किंमतीत झालेली वाढ हे आहे.

घाऊक किंमत निर्देशांक (WPI) गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर 2023 पर्यंत नकारात्मक होता. नोव्हेंबरमध्ये तो 0.26 टक्के सकारात्मक झाला. डिसेंबरमध्‍ये अन्नधान्याच्या किंमती वाढून महागाई 9.38 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, जी नोव्‍हेंबर 2023 मध्‍ये 8.18 टक्‍के होती.

यासोबतच डिसेंबर 2023 मध्ये घाऊक महागाईचा दर गेल्या 9 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाईव्यतिरिक्त इंधन आणि वीज आणि उत्पादनांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे घाऊक महागाई दरात वाढ झाली आहे. प्राथमिक वस्तूंच्या घाऊक किंमतीतही वाढ झाली आहे.

  • डिसेंबर 2023 मध्ये खाद्यपदार्थांच्या घाऊक महागाईचा दर 4.69% वरून 5.39% इतका वाढला आहे.

  • डिसेंबर 2023 मध्ये भाज्यांचा घाऊक महागाई दर 26.30% होता. याआधी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात हा आकडा 10.44% होता.

  • डिसेंबर 2023 मध्ये बटाट्याचा घाऊक महागाई दर -24.08% होता, जो नोव्हेंबर 2023 मध्ये -27.22% होता.

  • नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा घाऊक महागाई दर 191.24% होता. पण आता डिसेंबर 2023 मध्ये तो 91.77% वर आला.

  • याशिवाय डिसेंबर महिन्यात अंडी आणि मांसाचा घाऊक महागाई दर -0.84% ​​होता. नोव्हेंबर 2023 मध्ये तो 1.44% होता.

  • डिसेंबर 2023 मध्ये इंधन आणि उर्जेसाठी घाऊक महागाई दर मासिक आधारावर -2.41% होता. तर नोव्हेंबर 2023 मध्ये तो -4.61% होता.

  • डिसेंबर 2023 मध्ये उत्पादनांसाठी घाऊक महागाई दर -0.64% पर्यंत घसरला. तर नोव्हेंबर 2023 मध्ये तो -0.71% होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT