Generation Z Job Crisis  Sakal
Personal Finance

Generation Z Job Crisis : 'जेन-झी' तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येत आहेत अडचणी? कंपन्यांनीच थेट सांगितलं कारण

Gen Z career concerns : जगभरात अनेक कंपन्या जनरेशन झेड कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांहून काढून टाकत आहेत.

रोहित कणसे

जगभरात अनेक कंपन्या जनरेशन झेड कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांहून काढून टाकत आहेत. १९९० च्या दशकाच्या शेवटी आणि २००० च्या दशकाच्या सुरूवातीला जन्मलेल्या लोकांना जनरेशन झेड असे म्हटले जाते. ही पीढी इंटरनेटचा वापर करत वाढलेली पीढू असून हे तरुण उत्साहाने भरलेले असतता, असे असून देखील कंपन्या त्यांना काम देण्याबाबत हात आखडता घेताना दिसत आहेत.

तरुणांना का नोकऱ्या देत नाहीयेत कंपन्या?

जनरेशन झेडबद्दल एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे, ज्यामध्ये जगभरातील टॉपच्या कंपन्या जेन झी तरुणांना नोकऱ्या देणे टाळत असल्याचे समोर आले आहे. तसेच ज्या कंपन्या नोकऱ्या देत आहेत त्या काही महिन्यातच त्यांना काढून टाकत आहेत. कंपन्यांचे म्हणणे आहे की, कामाची पद्धत, कम्युनिकेशन स्किल्स आणि कामाबद्दल त्यांची बेफिकीर वर्तवणूक त्यांना पसंद पडत नाहीये.

इंटेलिजन्स डॉट कॉम कडून करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणात १० पैकी सहा रिक्रूटर्सनी त्यांनी या वर्षात अनेक कॉलेज पासआऊट झालेल्या लोकांना नोकरीहून काढून टाकले आहे. तर सात पैकी एका रिक्रूटरने हे सांहितले की पुढच्या वर्षी त्यांची कंपनीमध्ये नुकतेच पदवी मिळालेल्या उमेदवारांना नोकरीवर घेणे टाळेल.

सर्व्हेक्षणात काय सांगितलं?

इंटेलिजन्स डॉट कॉमच्या सर्व्हेक्षणात १००० कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता ज्याचे रिझल्ट सर्वात आधी न्यूजवीक ने रिपोर्ट केले होते. या रिपोर्टमध्ये इंटेलिजन्स डॉट कॉम चे मुख्य शिक्षा आणि करियर विकास सल्लागार ह्यू गुयेन म्हणाले की, नुकतेच पास झालेल्या तरूणांना पहिल्यांदा कार्यालयीन वातावरणात मिसळण्यास अडचणीचे ठरू शकते, कारण हे वातावरण कॉलेज लाइफपेक्षा खूप वेगळे असू शकते.

गुयेन म्हणाले की, कंपन्याचे मालक या जनरेशनमध्ये जन्मलेल्या लोकांना कामावर घेण्याबद्दल अनिश्चिततेच आहेत कारण या पीढीतील लोक कार्यालयाचे वातावरण, संस्कृती आणि जबाबादारी यासाठी तयार नाहीत.

तरुणांमध्ये प्रोफेशनलिज्मची कमतरता

गुयेन यांनी सांगितलं की तरुणांकडे कॉलेजमधून मिळालेलं पुस्तकी ज्ञान तर असते पण या लोकांकडे साधारणपणे व्यवहारिक, वास्तविक जगाचा आनुभव आणि ऑफिसमधील वर्क कल्चरमध्ये सहभागी होण्यासाठीचे स्किल्स नसतात.

आपल्या आधीच्या पीढीशी समकक्ष लोकांच्या उलट जेनरेशन झीमधील लोकांमध्ये ही समस्या खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे, यांच्यामध्ये कामावर कमी फोकस, आळस आणि कामाप्रति गंभीरतेचा आभाव या गोष्टी पाहायला मिळतात. हे सर्व डिजीटल जगात वाढल्याचे दुष्परिणामामुळे होत आहे.

युवा कर्मचारी सोशल मीडियावर चालवले जाणाऱ्या पॉलिटिकल आणि सोशल कँपेनमुळे लवकर प्रभावित होतात आणि त्यासाठी ते खूप उत्सुक देखील असतात ज्यामुळे त्यांच्या कामावर प्रभाव पडतो जो पुढे कंपनीसाठी डोकेदुखी ठरतो.

काम समाधानकारक नाही

या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल ७५ टक्के कंपन्यांनी सांगितले की त्यांना नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडलेल्या उमेदवारांचे काम समाधानकारक वाटले नाही. तसेच सर्वेत शहभागी अर्ध्याहून अधिक रिक्रूटर्सनी सांगितले की जनरेशन झी च्या लोकांमध्ये उत्साहाची कमतरता दिसते आणि ३९ टक्के लोक त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स नसल्याचे सांगतात.

जवळपास अर्धे (४६ टक्के) कंपन्यांनीसांगितले की जनरेशन झी मधील लोकांमध्ये प्रोफेशनलिज्मचा आभाव दिसून येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT