Why price of gold and silver fall today What are the reasons  Sakal
Personal Finance

Gold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या भावात का झाली घसरण? काय आहेत कारणं?

Gold and Silver Latest Price Update: आज 22 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. देशांतर्गत घटकांबरोबरच जागतिक पातळीवरील घडामोडीही सोन्याच्या भावातील चढ-उतारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

राहुल शेळके

Gold-Silver Rate Today 22 April 2024: आज 22 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. देशांतर्गत घटकांबरोबरच जागतिक पातळीवरील घडामोडीही सोन्याच्या भावातील चढ-उतारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदी 86,400 रुपये प्रति किलोपर्यंत घसरली आहे.

सोने आणि चांदीच्या घसरणीचे कारण?

सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या या प्रचंड घसरणीमागे अनेक कारणे आहेत, सर्वात मोठे कारण म्हणजे मध्यपूर्वेतील तणाव कमी होणे. गेल्या आठवड्यापर्यंत इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू होण्याची भीती होती.

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 2,400 डॉलरच्या वर गेला आहे. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते, त्यामुळे सोन्याच्या भावाला आधार मिळत होता. शुक्रवारी इस्रायलने प्रत्युत्तर देत इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केला. मात्र इराणने याला प्रत्युत्तर म्हणून काहीही केले नाही. त्यामुळे इराण सध्या बदला घेण्याच्या मनस्थितीत नाही, असा संदेश बाजारात गेला.

दुसरीकडे, अमेरिकेची आर्थिक आकडेवारीही आता फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करणार नसल्याचे संकेत देत आहे. मार्चमध्ये अमेरिकेचा किरकोळ चलनवाढीचा दर अपेक्षेपेक्षा जास्त होता, यामुळे आता व्यापारी गृहीत धरू लागले आहेत की जूनमध्ये दर कपात होणार नाही, भविष्यातही असे होईल की नाही हे महागाईच्या आकडेवारीवर अवलंबून असेल. जेव्हा व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतात, तेव्हा त्याचा सोन्याच्या भावावर दबाव येतो.

दिल्लीत आज सोन्याचा भाव

22 एप्रिल 2024 रोजी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 68,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 74,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबईत आज सोन्याचा भाव

मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबादमध्ये आजचा सोन्याचा भाव

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव 68,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ( What is the difference between 22 and 24 carats? )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT