Subrata Roy: सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या निधनाने गुंतवणूकदारांचे पैसे बुडतील का? असा प्रश्न आज करोडो गुंतवणूकदारांना पडला आहे. सहारा समूहाच्या 4 सहकारी संस्थांमध्ये कोट्यवधी गुंतवणूकदारांनी कष्टाचे पैसे जमा केले होते.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर लोकांना त्यांचे जमा केलेले पैसे मिळतील अशी आशा होती, पण आता सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय होणार? ते जाणून घेऊया
ऑगस्ट 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुमारे तीन कोटी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश दिले होते. यानंतर केंद्र सरकारने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी https://mocrefund.crcs.gov.in/ हे स्वतंत्र पोर्टल तयार केले. यावर लाखो लोकांनी अर्ज केले आहेत.
सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या ठेवीदारांना पैसे परत करण्यासाठी चार सोसायट्या जबाबदार आहेत.
1. सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, लखनौ
2. सहारन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, भोपाळ
3. हमरा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, कोलकाता
4. स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, हैदराबाद
या सोसायट्यांच्या माध्यमातून सहाराच्या गुंतवणूकदारांना पैसे मिळणार आहेत. पोर्टलमध्ये नमूद करण्यात आले आहे की, "ठेवीदारांनी चारही सोसायट्यांशी संबंधित सर्व दावे एकाच क्लेम अर्ज फॉर्ममध्ये सादर करावेत.
पोर्टलद्वारे ऑनलाइन दाखल केलेले दावे विचारात घेतले जातील. क्लेम सबमिशनसाठी कोणतेही शुल्क नाही. कोणत्याही तांत्रिक समस्येसाठी, समितीच्या टोल फ्री क्रमांकांवर (1800 103 6891 / 1800 103 6893) संपर्क साधावा."
याआधी शेअर बाजार नियामक सेबीने सहाराच्या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना 11 वर्षांत 138.07 कोटी रुपये परत केले आहेत. यासह बँक खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम 25,000 कोटींहून अधिक आहे. गुंतवणूकदारांचा पैसा सेबीकडे आहे आणि ज्यांनी ऑनलाइन अर्ज केले त्यांना पैसे मिळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.