Windfall tax Explainer Sakal
Personal Finance

Windfall Tax Explainer: मोदी सरकारने विंडफॉल टॅक्स आणला शून्यावर; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होणार?

Windfall Tax: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला आहे. देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर तो लादण्यात आला होता. नवीन कर दर आजपासून लागू झाले आहे.

राहुल शेळके

Windfall Tax: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला आहे. देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर तो लादण्यात आला होता. नवीन कर दर आजपासून लागू झाले आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने 1 जुलै 2022 रोजी त्यांच्या निर्यातीवर विंडफॉल टॅक्स लागू केला होता.

हा कर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कच्या (SAED) स्वरूपात आकारला जातो. दोन आठवड्यांतील सरासरी तेलाच्या किमतींवर आधारित दर पंधरवड्याला त्यात बदल केले जातात.

विंडफॉल टॅक्स म्हणजे काय?

अशा कंपन्यांवर विंडफॉल टॅक्स लावला जातो ज्यांना विशिष्ट परिस्थितीत मोठा फायदा मिळतो. तेल कंपन्या याचे उत्तम उदाहरण आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. तेल कंपन्यांना याचा खूप फायदा झाला, त्यामुळे त्यांच्यावर विंडफॉल टॅक्स लावण्यात आला.

ऑगस्टमध्ये शेवटची दुरुस्ती केली

यापूर्वी विंडफॉल टॅक्समध्ये दुरुस्ती 31 ऑगस्टला केली होती. त्यावेळी क्रूड पेट्रोलियमवर विंडफॉल टॅक्स 1,850 रुपये प्रति टन निश्चित करण्यात आला होता. डिझेल, पेट्रोल आणि विमान इंधनाच्या (ATF) निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क शून्यावर आणण्यात आले आहे.

रशिया तेल निर्यात करणारा सर्वात मोठा पुरवठादार देश

नवीन दर 18 सप्टेंबरपासून लागू होतील, असे अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे. देशात प्रथमच 1 जुलै 2022 रोजी विंडफॉल नफ्यावर कर लागू करण्यात आला. यासह भारत त्या देशांमध्ये सामील झाला जे ऊर्जा कंपन्यांच्या विंडफॉल नफ्यावर कर लावतात.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियावर निर्बंध लादण्यात आले आहेत. आता रशिया तेल निर्यात करणारा मोठा पुरवठादार आहे, पण निर्बंधांमुळे तो फारसा पुरवठा करू शकला नाही, त्यामुळे जगात तेलाचा पुरवठा कमी झाला आणि किंमत वाढली.

इकडे भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल विकत घेऊन जगाला चढ्या भावात विकून प्रचंड नफा कमावला, आता या नफ्यावर केंद्र सरकारने कर वसूल केला त्याला विंडफॉल टॅक्स म्हणतात.

Source: PPAC

अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?

विंडफॉल टॅक्स देखील इतर करांप्रमाणेच आहे. गेल्या वर्षी जेव्हा विंडफॉल टॅक्स वसूल केला जात होता तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती खूप जास्त आहेत. भारतीय तेल कंपन्या सर्व तेल निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत त्या कंपन्यांचा उत्साह कमी करण्यासाठी भरपूर विंडफॉल टॅक्स वसूल करण्यात आला.

विंडफॉल करातील कपातीचा तुमच्या खिशावर काही परिणाम होईल का?

नाही. विंडफॉल टॅक्सचा सर्वसामान्य जनतेशी काहीही संबंध नाही. हा टॅक्स तेल कंपन्यांकडून वसूल केला जात होता आणि तेही त्यांच्या नफ्यावर. विंडफॉल टॅक्समध्ये कपात केल्यास त्याचा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर कोणताही परिणाम होणार नाही. हा कर वाढवला तरी कोणताही परिणाम होणार नाही.

विंडफॉल टॅक्स वाढवून किंवा कमी करून कोणाला फायदा होतो?

विंडफॉल टॅक्सचा सर्व पैसा सरकारी तिजोरीतच जातो. ज्याप्रमाणे सरकार आपल्या कल्याणकारी योजनांवर उर्वरित कर खर्च करते, त्याचप्रमाणे विंडफॉल टॅक्सचा पैसाही सरकारी योजनांवर खर्च केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT