Woman loses Rs 2.7 crore after joining an Instagram group, here is what happened  Sakal
Personal Finance

Cyber Crime: इंस्टाग्रामवर एक क्लिक अन् महिलेने गमावले 2.7 कोटी रुपये; काय आहे प्रकरण?

Cyber Crime: ऑनलाईन फसवणुकीमुळे 52 वर्षीय उद्योजिकेला 2.7 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना 6 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घडली आहे. YouTube चॅनेल लाइक करण्याचे आमिष महिलेला दाखवण्यात आले होते.

राहुल शेळके

Cyber Crime: ऑनलाईन फसवणुकीमुळे 52 वर्षीय उद्योजिकेला 2.7 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना 6 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घडली आहे. YouTube चॅनेल लाइक करण्याचे आमिष महिलेला दाखवण्यात आले होते. YouTube चॅनेल लाइक केले तर त्यातून पैसे मिळतील असे महिलेला सांगण्यात आले होते.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, पीडितेने तत्काळ सायबर क्राईम पोलिसांना घटनेची माहिती दिली, ज्यामुळे गुन्हेगारांची बँक खाती शोधणे आणि गोठवणे शक्य झाले. स्कॅमर इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध चॅनेलद्वारे फसवणूक करतात.

डीसीपी (पूर्व) कुलदीप कुमार जैन यांनी खुलासा केला की न्यायालयाच्या परवानगीने, पीडितेला एका आठवड्यात 1.7 कोटी रुपये परत केले आहेत. उर्वरित पैसे परतफेडीसाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

जर तुम्ही ऑनलाइन फसवणुकीला बळी पडला असाल तर सर्वप्रथम तुम्ही तुमचे बँकिंग तपशील सुरक्षित ठेवा. यामध्ये, तुम्ही UPI, पेमेंट वॉलेट, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांसारखे ऑनलाइन पेमेंटचे पर्याय ब्लॉक करावेत आणि तुमच्या परवानगीशिवाय पुढील व्यवहार होणार नाहीत याची खात्री करा.

ऑनलाइन फसवणुकीची तक्रार कशी करावी?

  • फसवणुकीची तक्रार ऑनलाइन नोंदवता येते.

  • यासाठी तुम्हाला cybercrime.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

  • वेबसाइटच्या होम पेजवर फाइल कम्प्लेंट वर क्लिक करा.

  • यानंतर, सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचा आणि Report Other Crime वर क्लिक करा.

  • आता Citizen Login वर क्लिक करा आणि तपशील टाकून लॉगिन करा.

  • जे लोक प्रथमच वेबसाइटला भेट देत आहेत त्यांना प्रथम नोंदणी करावी लागेल.

  • आता सायबर क्राईम तपशील भरा आणि फॉर्म पुन्हा तपासा आणि सबमिट करा.

  • फसवणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे जोडा जेणेकरून पोलिसांना मदत मिळू शकेल.

  • फसवणूक करणाऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास ती माहिती द्या.

  • त्यानंतर तुम्हाला एक तक्रार आयडी मिळेल ज्याचा तुम्ही वेळोवेळी मागोवा घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT