World Bank keeps India's GDP growth estimate unchanged  Sakal
Personal Finance

World Bank: जागतिक अर्थव्यवस्था आणखी मंदावेल, पण भारताचा वेग कायम राहील, जागतिक बँकेचा अंदाज

World Bank on India: येत्या 2 वर्षात जगामध्ये भारताचा प्रभाव आणखी वाढणार आहे. कारण भारत पुढील 2 वर्षात 6 टक्क्यांहून अधिक विकास साधून जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे.

राहुल शेळके

World Bank on India: येत्या 2 वर्षात जगामध्ये भारताचा प्रभाव आणखी वाढणार आहे. कारण भारत पुढील 2 वर्षात 6 टक्क्यांहून अधिक विकास साधून जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे.

मंगळवारी दिलेल्या माहितीत जागतिक बँकेने सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक वाढ वर्ष 2025 मध्ये 6.4 टक्के आणि आर्थिक वर्ष 2026 मध्ये 6.5 टक्के वाढ होईल. जागतिक बँकेच्या अहवालानुसार गुंतवणुकीचा वेग काहीसा कमी राहील पण त्याचा पाया मजबूत राहील. सरकारी खर्च आणि कॉर्पोरेट बॅलन्स शीटमुळे अर्थव्यवस्था मजबूत राहील. बँकांची स्थितीही चांगली राहण्याची अपेक्षा आहे.

जागतिक बँकेने 2024 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी जागतिक विकासदर मंदावण्याची शक्यता वर्तवली आहे. 2024 मध्ये जागतिक विकासदर 2.4 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. जो 2023 मध्ये 2.6 टक्के होता.

या अहवालात म्हटले आहे की, जगभर संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन आणि मध्यपूर्वेमध्ये होत असलेल्या संघर्षांमुळे ऊर्जेच्या किंमती वाढून महागाईवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, उत्तर अमेरिका, युरोप आणि मध्य आशियातील वाढ यंदा कमी राहू शकते.

एनएसओ आणि रिझर्व्ह बँक व्यतिरिक्त, अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी देखील भारताचा आर्थिक विकास दर मजबूत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे 7 टक्के वाढीचा दर म्हणजे भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. येत्या काही वर्षांत जागतिक मंदीनंतरही भारताची ही वाढ कायम राहील, असा विश्‍वास जागतिक बँकेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT