International Monetary Fund sakal
Personal Finance

World Economy : जागतिक अर्थव्यवस्था मंदावणार; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

उच्च व्याजदर, युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि इस्राईल-हमासमध्ये सुरू झालेले युद्ध यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग आणखी मंदावण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - उच्च व्याजदर, युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि इस्राईल-हमासमध्ये सुरू झालेले युद्ध यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग आणखी मंदावण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, जागतिक आर्थिक वाढीचा दर या वर्षी अपेक्षित तीन टक्क्यांवरून २.९ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असून, पुढील वर्षीही हा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

विनाशकारी कोविड महासाथीमुळे २०२० मध्ये मंदीचा सामना करणारी जागतिक अर्थव्यवस्था अद्याप पूर्णपणे सावरलेली नसतानाच, रशिया-युक्रेन युद्ध आणि आता सुरू झालेले इस्राईल-हमासमधील युद्ध यामुळे पुन्हा मंदीचे संकट ओढवले आहे.

कोविड साथ, रशियाचे युक्रेनवरील आक्रमण यासह अनेक धक्क्यांमुळे जगभरातील आर्थिक उत्पादनात गेल्या तीन वर्षांत कोविडपूर्व काळाच्या तुलनेत सुमारे ३.७ लाख कोटी डॉलरची घट झाली आहे, याकडे नाणेनिधीने लक्ष वेधले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पिएरे-ऑलिव्हियर गौरीनचास यांनी मोरोक्को येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे. मात्र, स्थिती पूर्णतः वाईट आहे, असे नाही.

सध्याच्या स्थितीत महागाईचा सामना करण्यासाठी जेव्हा अमेरिकी फेडरल रिझर्व्ह आणि जगभरातील इतर मध्यवर्ती बँकांनी व्याजदर आक्रमकपणे वाढवले असतानाही जागतिक अर्थव्यवस्थेने चांगली लवचिकता दर्शविली आहे. या व्याजदरवाढीमुळे अनेकांना बेरोजगार न करता महागाईचा दबाव कमी होण्यास मदत केली आहे. मंदीला चालना न देता महागाई रोखण्याचे काम दरवाढीमुळे झाले आहे.

जागतिक ग्राहक किंमत महागाई २०२२ मधील ८.७ टक्क्यांवरून यावर्षी ६.९ टक्क्यांपर्यंत आणि २०२४ मध्ये ५.८ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नाणेनिधीने अमेरिकेच्या वाढीचा दर यावर्षी २.१ टक्के आणि २०२४ मध्ये १.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी चीनची अर्थव्यवस्था या वर्षी पाच टक्के आणि २०२४ मध्ये ४.२ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. जुलैमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजित दरापेक्षा हा दर कमी आहे. युरोपीय देशांचा २०२४ मधील वाढीचा दर १.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला असून, त्यात आधी वर्तवलेल्या अंदाजात घट केली आहे.

यंदा हा दर ०.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा दर पुढील वर्षी ०.९ टक्क्यांपर्यंत वाढेल, मात्र या वर्षी ती ०.५ टक्क्यांनी वाढेल,असे ही नाणेनिधीने म्हटले आहे.

भू-राजकीय तणावाचे कारण

वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक वाढ मर्यादित होऊ शकते, असेही नाणेनिधीने म्हटले आहे. युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत, तसेच चीनकडून होणारी आयात कमी केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम झाला असून, यात यावर्षी केवळ ०.९ टक्के वाढ झाली असून, २०२४ मध्ये ३.५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT