Top 10 Shares In Action Today Esakal
Sakal Money

Share Market Today: सलग तेजीनंतर बाजारात आज काय होणार? हे 10 शेअर्स ठरतील लक्षवेधी

Share Market Investment Tips: पुढे, बँकिंग आणि आयटी कंपन्यांसारख्या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केले जाईल. तथापि, प्रत्येक करेक्शनवर, गुंतवणूकदारांना मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळेल.

आशुतोष मसगौंडे

Top 10 Shares In Action Today:

गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीत राहिला. बेंचमार्क सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकाच्या जवळ बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 655.04 अंकांच्या अर्थात 0.90 टक्क्यांच्या वाढीसह 73,651.35 वर आणि निफ्टी 203.20 अंकांच्या म्हणजेच 0.92 टक्क्यांच्या वाढीसह 22,326.90 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी 22100 च्या वर कायम राहिल्यानंतर 22,500 ची पातळी ओलांडून चांगला फायदा मिळवल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. याशिवाय, कंसोलिडेशन ब्रेकआउट डेली टाइम फ्रेमवर दिसून आला जे वाढत्या तेजीचे लक्षण आहे.

तरीसुद्धा, निफ्टीला त्याच्या पूर्वीच्या 22,526 च्या हाय स्विंगच्या जवळ रझिस्टंसचा सामना करावा लागला. अशा स्थितीत सातत्य राखण्यासाठी त्याला 22,525 ची पातळी पार करावी लागेल. खाली शॉर्ट टर्म सपोर्ट 22,200 च्या पातळीवर दिसत आहे.

बेंचमार्क इंडेक्सच्या महागड्या व्हॅल्युएशनमुळे बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून येत असल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे म्हणाले. पुढील महिन्यापासून, बाजाराचे लक्ष आर्थिक वर्ष 2024 च्या निकालांकडे असेल.

पुढे जाऊन, बँकिंग आणि आयटी कंपन्यांसारख्या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केले जाईल. तथापि, प्रत्येक करेक्शनवर, गुंतवणूकदारांना मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळेल.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

ग्रासिम (GRASIM)

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

बजाज फायनान्स (BAJFINANCE)

आयशर मोटर्स (EICHERMOT)

भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

SCROLL FOR NEXT