Penny Stock Investment : 5 वर्षात 'या' पेनी स्टॉकचा 1180% तगडा परतावा... sakal
Share Market

Penny Stock Investment : 5 वर्षात 'या' पेनी स्टॉकचा 1180% तगडा परतावा...

सकाळ वृत्तसेवा

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही रतन इंडिया पॉवर लिमिटेडच्या (RatanIndia Power) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या पेनी स्टॉकने अतिशय कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

सध्या बीएसईवर हे शेअर्स 16.49 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 8,855 कोटी आहे. रतनइंडिया पॉवर लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या खासगी वीज निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील अमरावती आणि नाशिकमध्ये एकूण 2700 मेगावॅट औष्णिक वीज प्रकल्पांची क्षमता आहे.

तिमाही निकालांनुसार रतन इंडिया पॉवर लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 914 कोटीची निव्वळ विक्री नोंदवली, तर आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीमध्ये हा आकडा 901 कोटी होता. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 चौथ्या तिमाहीमध्ये 10666 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे, तर आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 483 कोटीचा निव्वळ तोटा झाला आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 3364 कोटीची निव्वळ विक्री नोंदवली, तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये हा आकडा 3231 कोटी होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 1870 कोटीच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 8897 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला.

आर्थिक वर्ष 2023, आर्थिक वर्ष 2022 आणि आर्थिक वर्ष 2021 मध्ये सलग 3 वर्षांच्या निव्वळ तोट्यानंतर कंपनीने निव्वळ नफा नोंदवला. 2019 पासून कंपनी सातत्याने कर्जाची परतफेड करत आहे आणि तिचा ऑपरेशनल परफॉर्मंस मजबूत आहे.

रतन इंडिया पॉवर लिमिटेडने 5 वर्षांमध्ये 1180 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे. मात्र, गेल्या 6 महिन्यांत 53 टक्के इतका मजबूत परतावा दिला. पण या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 79 टक्क्यांनी घसरलेत. या स्टॉकने केवळ 1 वर्षात 230 टक्के आणि 5 वर्षात सुमारे 1180 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT