25 percent growth in 6 days this company will decide on bonus issue and dividend soon Sakal
Share Market

6 दिवसांत 25% तेजी, बोनस इश्यू आणि डिव्हिडेंडवर लवकरच निर्णय घेणार ही कंपनी...

खूबसूरत लिमिटेड (Khoobsurat Limited) लवकरच बोनस इश्यू आणि डिव्हिडेंडबाबत त्यांच्या बोर्ड बैठकीत निर्णय घेणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

खूबसूरत लिमिटेड (Khoobsurat Limited) लवकरच बोनस इश्यू आणि डिव्हिडेंडबाबत त्यांच्या बोर्ड बैठकीत निर्णय घेणार आहे. या फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट सेक्टरमधील कंपनीची बोर्ड बैठक 12 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. या बैठकीत कंपनी बोनस जारी करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ शकते.

यासोबतच कंपनी लाभांश देण्याच्या प्रस्तावावरही विचार करणार आहे. 24 जुलै रोजी, कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किटला धडक दिली आहे आणि तो बीएसईवर 1.71 रुपयांवर ट्रेड करत आहे, जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. सलग सहाव्या दिवशी कंपनीचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. या कालावधीत हा शेअर सुमारे 25 टक्क्यांनी घसरला आहे. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 80.42 कोटी झाले आहे.

खूबसूरत लिमिटेडने एसए-22 आणि एसए-23 गोव्यातील कुनकोलिम इंडस्ट्रियल अस्टेट इथे असलेल्या त्यांच्या ब्रुअरी प्रोजेक्टमध्ये लक्षणीय प्रगती जाहीर केली आहे. प्रॉडक्शन कॅपिसिटी आणि रेव्हेन्यू वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट कंपनीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

स्थानिक स्तरावर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि नॉन-रिफंडेबल फीस भरल्यानंतर अर्ज उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल असे कंपनीने सांगितले. इस्टेब्लिशमेंट लायसन्स अर्थात स्थापनेचा परवाना प्राप्त केल्यानंतर मद्यनिर्मिती उपकरणे ऑर्डर करता येतील आणि शेवटी बिअरच्या उत्पादन परवान्यासाठी अर्ज करता येईल असेही त्यांनी सांगितले.

1982 मध्ये स्थापित खूबसूरत लिमिटेड फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटच्या व्यवसायात आहे. कंपनीचा मुख्य व्यवसाय लिस्टेड आणि अन-लिस्टेड दोन्ही शेअर्स आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. यासह, कंपनी इतर आर्थिक सेवाही प्रदान करते.

खूबसूरत लिमिटेड चे शेअर्स गेल्या एका महिन्यात 25 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 27 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 92 टक्के परतावा मिळाला आहे. इतकेच नाही तर गेल्या 4 वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 1040 टक्के इतका मोठा नफा मिळाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT