Aadhar Housing Finance IPO Sakal
Share Market

Aadhar Housing Finance IPO: 8 मे पासून खुला होणार आधार हाउसिंग फायनान्सचा IPO; 3,000 कोटी उभारण्याची योजना

राहुल शेळके

Aadhar Housing Finance IPO: आधार हाउसिंग फायनान्सचा (Aadhar Housing Finance) आयपीओ पुढच्या आठवड्यात 8 मेपासून खुला होणार आहे. यात 10 मेपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. ब्लॅकस्टोन ग्रुपने गुंतवणूक केलेली ही कंपनी आयपीओमधून सुमारे 3,000 कोटी उभारण्याची योजना आखत आहे.

येत्या एक-दोन दिवसांत शेअर्सच्या प्राइस बँडची घोषणा केली जाईल असे कंपनीने म्हटले आहे. यासह पुढील आठवड्यात उघडणारा हा तिसरा आयपीओ असेल. आयपीओमध्ये 1,000 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याचे प्रमोटर बीसीपी टोपको सुमारे 2,000 कोटीचे शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहेत.

बीसीपी टोपको पीटीई हा ब्लॅकस्टोन ग्रुपच्या सहयोगी फर्मद्वारे व्यवस्थापित केलेला फंड आहे. आधार हाऊसिंग फायनान्समध्ये त्याचा 98.72 टक्के हिस्सा आहे. जून 2019 पासून कंपनीची प्रमोटर आहे. कंपनीचा उर्वरित हिस्सा पब्लिक शेअरहोल्डर्सकडे आहे. यामध्ये 1.18 टक्के हिस्सेदारी असलेल्या आयसीआयसीआय बँकेचाही समावेश आहे.

कंपनीने आधी 5,000 कोटी उभारण्याची योजना आखली होती, पण आता तिचा आकार कमी करून 3,000 कोटी केला आहे. मसुदा पेपरनुसार, जानेवारी 2024 मध्ये कागदपत्रे सादर करताना, कंपनीने 1,000 कोटीचे नवीन शेअर्स आणि 4,000 कोटीची ऑफर-फॉर-सेल (OFS) जारी करण्याची योजना आखली होती.

आधार हाऊसिंग फायनान्सने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) आपला अर्धा आयपीओ आरक्षित केला आहे. तर 15 टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे, तर उर्वरित 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 7 कोटी रुपयांचे शेअर्स राखून ठेवले आहेत. अँकर गुंतवणूकदारांसाठी, आधार हाउसिंग फायनान्सचा आयपीओ एक दिवस आधी म्हणजेच 7 मे रोजी उघडेल.

अँकर गुंतवणूकदारांना QIB साठी राखून ठेवलेल्या भागातून शेअर्स वाटप केले जातील. नवीन शेअर्सच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेतून 750 कोटी भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहेत. उर्वरित रक्कम इतर सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT