Acums Drugs & Pharmaceuticals IPO of 1856 Crores Opened Huge Demand in Gray Market Sakal
Share Market

Acums Drugs & Pharmaceuticals IPO: 1856 कोटींचा एकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्सचा आयपीओ खुला, ग्रे मार्केटमध्ये मोठी मागणी...

Acums Drugs & Pharmaceuticals IPO Date latest news | गुंतवणूकदारांना याच 1 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. इश्यूच्या माध्यमातून 1856.74 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.

सकाळ वृत्तसेवा

एकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्सचा आयपीओ (Akum Drugs and Pharmaceuticals ) आज अर्थात 30 जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना याच 1 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. इश्यूच्या माध्यमातून 1856.74 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. यामध्ये 680 कोटीचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील.

त्याच वेळी, 1176.74 कोटीचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकले जातील. इश्यूसाठी प्रति शेअर 646-679 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. एकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्सची 2004 मध्ये सुरू झाली. कंपनी एक फार्मास्युटिकल CDMO (कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन) आहे. हे भारतात आणि परदेशात फार्मा उत्पादनांची विस्तृत श्रेणी ऑफर करते.

आयपीओ उघडण्याच्या एक दिवस आधी ग्रे मार्केटमध्ये एकम्स ड्रग्सच्या शेअर्सना मोठी मागणी दिसून आली. अनलिस्टेड मार्केटमध्ये 195 च्या प्रीमियमवर हा आयपीओ ट्रेडिंग करत होता. त्यानुसार कंपनीचे शेअर्स 874 रुपये किमतीला लिस्ट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, गुंतवणूकदारांना लिस्टींगवर 28.72 टक्के इतका मोठा नफा होईल.

आयपीओमध्ये गुंतवणूकदार एका लॉटमध्ये आणि नंतर त्याच्या पटीत किमान 22 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात. कंपनीची एकूण मार्केट व्हॅल्यू अंदाजे 10,201 कोटी आहे. या ऑफरमध्ये 680 कोटीच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि प्रमोटर आणि विद्यमान गुंतवणूकदार यांच्याकडून 1.73 कोटी शेअर्सची ऑफर-फॉर-सेल (OFS) समाविष्ट आहे. ओएफएसअंतर्गत, प्रमोटर संजीव जैन, संदीप जैन आणि गुंतवणूकदार रुबी क्यूसी होल्डिंग्ज (कुडारिया कॅप) शेअर्सची विक्री करतील.

आयपीओमधून जमा होणारा निधी कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल. याशिवाय, हा निधी अधिग्रहणांद्वारे इनऑर्गेनिक ग्रोथ उपक्रमांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल.

आयपीओपैकी 75% पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी असेल, 15% गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) आणि उर्वरित 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 15 कोटीचे शेअर्स राखून ठेवले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT